Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra Local Body Polls updates: महाराष्ट्रात नगर पालिकांसाठी मतदान सुरू! हजारो उमेदवार रिंगणात

Maharashtra Local Body Polls updates : महाराष्ट्रातील ग्रामीण आणि निम-शहरी राजकारणाची दिशा ठरवणारे स्थानिक स्वराज्य संस्थांचे महासंग्राम आज मतदानासाठी सज्ज झाले आहे. एकूण २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज सकाळी ७:३० वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. आज हजारो उमेदवाराचे मतपेटीत भविष्य बंद होणार आहे.

आज सर्वसाधारणपणे शांततेत मतदानाचा हक्क बजावला जात असताना, राहाटा येथे EVM मशीन बदलल्याने आणि राजुरा येथे मतदारांना पैशांचे आमिष दाखवल्याच्या आरोप मतदानाच्या सुरुवातीलाच झाला आहे. आजची ही निवडणूक केवळ स्थानिक स्तरावरची नसून, ती राज्यातील प्रमुख पक्षांची ताकद आणि कार्यकर्त्यांची बांधणी तपासणारी 'मिनी-विधानसभा' ठरणार आहे.

Maharashtra Local Body Polls updates

ताजी स्थिती: प्रमुख जिल्ह्यांमध्ये मतदानाची लगबग

सकाळच्या सत्रात नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचत आहेत. सायंकाळी ५:३० पर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहील.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: प्रमुख जिल्ह्यांमधील स्थिती

वाशिम मतदानाचे स्वरूप: ३ नगरपरिषदा (रिसोड, कारंजा, मंगरुळपीर) आणि मालेगाव नगरपंचायतीसाठी मतदान. उमेदवारांची संख्या आणि मतदार: अध्यक्षपदासाठी २७ उमेदवार, ९० सदस्यपदांसाठी ३७४ उमेदवार रिंगणात.

अमरावती मतदानाचे स्वरूप: ९ नगरपरिषद आणि २ नगरपंचायतीसाठी मतदान सुरू. (अंजनगाव नगरपरिषद वगळता). उमेदवारांची संख्या आणि मतदार: ११ नगराध्यक्षपदांसाठी ६४, तर २५० नगरसेवक पदांसाठी १०४८ उमेदवार रिंगणात.

नाशिक मतदानाचे स्वरूप: जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांसाठी ४१६ मतदान केंद्रांवर प्रक्रिया पार पडणार. उमेदवारांची संख्या आणि मतदार: नगराध्यक्ष पदासाठी ५६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.

पुणे मतदानाचे स्वरूप: पुणे जिल्ह्यातील १२ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायतींसाठी मतदान. उमेदवारांची संख्या आणि मतदार: सुमारे ६.३ लाख नोंदणीकृत मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
मतदानाच्या सुरुवातीलाच गोंधळ

EVM मशीनवरून गदारोळ

टीव्ही 9 च्या वृत्तानुसार, राहाता पालिकेतील काही वॉर्डसाठीचे EVM मशीन बदलले असल्याची माहिती मिळताच विविध पक्षांतील उमेदवार आक्रमक झाले. आक्रमक उमेदवारांनी अधिकाऱ्यांना जाब विचारल्यामुळे राहाता पालिकेत तासभर गोंधळाची स्थिती होती.

पैसे वाटपाचा आरोप

राजुरा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ मधील भाजप उमेदवाराच्या वडिलांकडून मतदारांना ५०० रुपयांच्या नोटा वाटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी काँग्रेस नेत्यांनी निवडणूक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.

निकालाची प्रतीक्षा

राज्यभरातील एकूण २६४ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा अंतिम निकाल बुधवारी (०३ डिसेंबर २०२५) मतमोजणीनंतर जाहीर होणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+