Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra Local Body Election : मतदान कार्ड हरवलंय, मग Online असे डाऊनलोड करा अन् मतदानाला जा...

Maharashtra Local Body Election 2025 download e epic voter id card online easy steps : महाराष्ट्रातील राज्यभरातील एकूण २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज ०२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होत आहे. सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मतदार सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत आपला हक्क बजावू शकतील. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरक्षितपणे पार पडावी, यासाठी सर्व मतदान केंद्रांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Maharashtra Local Body Election

मतदान करण्याची वेळ सायंकाळी साडेपाचपर्यंत आहे, यादरम्यान जर तुम्हाल मतदान करण्यासाठीचे मतदार ओळखपत्र (Voter ID Card) हरवले असेल किंवा मतदान कार्ड उपलब्ध नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांसाठी डिजिटल मतदार ओळखपत्र (e-EPIC) डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. हे डिजिटल ओळखपत्र मूळ पीव्हीसी कार्ड इतकेच वैध असून, ते मिनिटांत आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरवर डाऊनलोड करता येते.

e-EPIC म्हणजे काय?

e-EPIC (इलेक्ट्रोरल फोटो आयडेंटिटी कार्ड) हे मतदार ओळखपत्राचे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट (PDF) स्वरूप आहे.हे कार्ड मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येते किंवा कॉम्प्युटरवर प्रिंट करण्यायोग्य स्वरूपात उपलब्ध असते.

फायदे काय?

मतदार हे कार्ड मोबाईलमध्ये स्टोअर करू शकतात, डिजीलॉकरमध्ये अपलोड करू शकतात किंवा त्याची प्रिंट काढून स्वतः लॅमिनेट करू शकतात. डिजिटल स्वरूपात असले तरी, हे कार्ड मतदार ओळखपत्रासाठी तेवढेच वैध आहे.

e-EPIC डाऊनलोड करण्याची सोपी प्रक्रिया

  • पोर्टलवर भेट द्या: निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जा: https://voterportal.eci.gov.in किंवा https://nvsp.in/
  • खाते तयार करा/लॉगिन करा: NVSP पोर्टलवर तुमचे खाते तयार करा आणि लॉगिन करा.
  • माहिती भरा: तुमचा EPIC क्रमांक (मतदार ओळखपत्र क्रमांक) किंवा फॉर्म संदर्भ क्रमांक (Form Reference Number) प्रविष्ट करा आणि तुमचे राज्य निवडा.
  • OTP पडताळणी: तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक OTP (वन टाइम पासवर्ड) येईल.
  • डाऊनलोड करा: OTP प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला 'Download e-EPIC' हा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा.
  • सेव्ह आणि प्रिंट: मतदार ओळखपत्राची एक PDF फाईल डाऊनलोड होईल. ती सेव्ह करून तुम्ही प्रिंट काढू शकता.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+