Maharashtra Local Body Election : झेडपी, मनपा निवडणुकीची आज 4 वाजता घोषणा? निवडणूक आयोगीची प्रेस
Maharashtra Local Body Election 2025 Date LIKELY Today : राज्याचे राजकीय तापमान वाढवणारी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वच राजकीय पक्षांना आणि सर्वसामान्य नागरिकांना ज्याची प्रतीक्षा होती, ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तारीख आज अखेर जाहीर होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या ३१ जानेवारी २०२६ च्या डेडलाईनमुळे राज्य निवडणूक आयोगावर 'वेळेचा दबाव' आहे. याच पार्श्वभूमीवर, 'एबीपी माझा'च्या वृत्तानुसार, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांचा 'बिगुल' वाजवणार की, आणखी काही दिवसांसाठी 'गुगली' टाकणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

आजची ही पत्रकार परिषद केवळ तारखांची घोषणा नसेल, तर राज्यात तात्काळ आचारसंहिता लागू करत, सत्ता आणि नेतृत्वाच्या संघर्षाची नांदी ठरणार आहे. याच परिषदेत महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांसह सर्व निवडणुकांच्या तारखांची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. सूत्रांनुसार, ही घोषणा होताच राज्यात तात्काळ आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.
ताजी घडामोड आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. या डेडलाइनमुळे राज्य निवडणूक आयोगावर वेळेचे मोठे बंधन आले आहे.
आजची शक्यता सर्वाधिक असून वेळेचे बंधन आणि निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद आयोजित केल्याने, आज दुपारी ४ वाजता तारखांची घोषणा होण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
तीन टप्प्यांत होणार निवडणूक प्रक्रिया
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पाडली जाईल. संपूर्ण प्रक्रिया २१ दिवसांच्या कालावधीत पूर्ण केली जाईल.
तीन टप्प्यांत होणार निवडणूक प्रक्रिया
राज्यातील ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पाडली जाईल. संपूर्ण प्रक्रिया २१ दिवसांच्या कालावधीत पूर्ण केली जाईल.
टप्पा १: नगरपालिका आणि नगरपंचायती
- समावेश असलेल्या संस्था: २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायती
- अंदाजित मतदानाची वेळ: नोव्हेंबर २०२५ मध्ये
टप्पा २: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या
- समावेश असलेल्या संस्था: जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समित्या
- अंदाजित मतदानाची वेळ: लवकरच जाहीर
टप्पा ३: महानगरपालिका
- समावेश असलेल्या संस्था: सर्व महानगरपालिका
- अंदाजित मतदानाची वेळ: लवकरच जाहीर
किती संस्थांची मुदत संपली?
- महापालिका : २९
- जिल्हा परिषदा : ३२
- पंचायत समित्या : ३३६
- नगर पंचायती : ४२
- नगरपालिका : २४६
या सर्व संस्थांची मुदत संपल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य व्यवस्था निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहे. आजच्या घोषणेमुळे राज्यातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग येण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications