Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

विधानसभेत हायहोल्टेज ड्रामा! नाना पटोलेंचे विधानसभेत 'हे' कृत्य! एक दिवसांसाठी केले निलंबित

Maharashtra Legislative Session 2025 : महाराष्ट्र विधानसभेत आज मोठा हायहोल्टेज ड्रामा झाला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या आसनाकडे धावून जात राजदंडाला स्पर्श केल्याप्रकरणी काँग्रेस सदस्य नाना पटोले यांना दिवसभरासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात ययाबाबतची घोषणा केली.

माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आज सभागृहात आज गदारोळ झाला. बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी यासाठी विरोधकांनी मागणी केली. नाना पटोले यांनी ही मागणी जोरकसपणे मांडली, यावेळी त्यांनी अध्यक्षांच्या आसनाकडे धावून जात राजदंडाला स्पर्श केला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी पटोले यांनी एक दिवसांसाठी निलंबित केले.

Maharashtra Legislative Session 2025

विरोधकांचा सभात्याग

नाना पटोले यांना आज निलंबित केल्यानंतर विरोधकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आजच्या दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. हे नाट्य आज विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी घडले.

भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी आणि कृषिमंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्ये करून शेतकऱ्यांचा अपमान केला आहे त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी करत अध्यक्षांकडे धाव घेत राजदंड उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या नाना पटोले यांना अध्यक्षांनी दिवसभरासाठी निलंबित केलं. यावर निषेध व्यक्त करत विरोधी पक्षांनी सभात्याग केला आणि कामकाजावर बहिष्कार घातला.

पटोले यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून ही मागणी केली होती, यावर ते आक्रमक होत अध्यक्षांच्या आसनाकडे गेले आणि त्यांनी राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे इतर सदस्य ही अध्यक्षांच्या आसनाकडे गेले. यावर दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली,यामुळे अध्यक्षांनी कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब केलं होतं.

यानंतर कामकाज पुन्हा सुरू होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पटोले यांनी अध्यक्षांकडे धावून जाणे , त्यांच्या अंगावर जाणे योग्य नाही, त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यावर अध्यक्षांनी राजदंडाला हात घातला म्हणून पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित केलं. त्यानंतर पुढील कामकाजात विरोधी सदस्य सहभागी झाले नाहीत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+