Maharashtra Jharkhand Election Result 2024 : महाराष्ट्रात महायुती, झारखंडमध्ये हेमंत सोरेन सरकार
Maharashtra Jharkhand Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 :- झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. तरीही काही जागांचे निकाल येणे अजून बाकी आहे. अनेक जागांच्या निकालसाठी मतमोजणी सुरू आहे. आत्तापर्यंतच्या हाती आलेल्या कलानुसार महाराष्ट्रात महायुतीला 223 जागा, महाविकास आघाडी 54 आणि इतरांना 11 जागा मिळताना दिसत आहेत. तर झारखंडमध्ये भाजप आघाडीला 29 जागा, JMM+ ला 51 जागा आणि इतरांना 1 जागा मिळत असल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्रात विक्रमी मतदान
यावर्षी महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडी यांच्या मुख्य लढत झाली. शिवसेना व त्यांनंतर राष्ट्रवादीत फाटाफूट झाल्यानंतरही ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या दोन्ही गटांकडून आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 65.1 टक्के मतदान झाले. हा आकडा गेल्या तीस वर्षांतील विक्रमी आकडा ठरला.
झारखंडमध्ये 68 टक्के मतदान
झारखंडमध्ये बुधवारी दुसऱ्या टप्प्यातील 38 जागांसाठीचे मतदान पार पडले. 1.23 कोटी मतदारांपैकी 68 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या टप्प्यात 43 जागांसाठी 66 टक्के मतदान झाले होते.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications