Maharashtra Election Voting : महाराष्ट्रात 5 वाजेपर्यंत 58 टक्के, तर झारखंडमध्ये 67 टक्के मतदान,
Maharashtra JK Election 2024 Voting : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि.20) बुधवारी 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं. त्याचबरोबर झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 38 जागांवरही मतदान पार पडले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 58 टक्के तर झारखंडमध्ये 67 टक्के मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत गडचिरोलीत सर्वाधिक 69.63%, तर सर्वात कमी मतदान मुंबई शहर विभागात 49.07% मतदान झाले. मतमोजणी 23 तारखेला होईल. तर मतदानाची शेवटची आकडेवारी रात्री उशीरापर्यंत निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात येईल.
महाराष्ट्रात मविआ Vs मविआ लढत
शिंदे गटातील शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हे भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील महायुतीचा भाग आहेत. तर काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना (UBT) आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) हे महाविकास आघाडीचा भाग आहेत.

कोणत्या पक्षाचे किती उमेदवार मैदानात?
भाजप: 149 जागा
शिवसेना (शिंदे गट): 81 जागा
राष्ट्रवादी (अजित पवार गट) : 59 जागा
काँग्रेस : 101 जागा
शिवसेना (उद्धव गट): 95 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): 86 जागा
बसपा : 237 उमेदवार रिंगणात
AIMIM: 17 उमेदवार
एकूण उमेदवार किती?
एकूण उमेदवार: एकूण 4,136
अपक्ष उमेदवार : 2,086 अपक्ष
झारखंड 38 जागांसाठी 528 उमेदवार मैदानात..!
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 43 जागांवर निवडणूक झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात 38 विधानसभा जागांसाठी आज दि.20 नोव्हेंबरला मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात संथाल परगण्यातील जागांवर लिटमस टेस्ट आहे. अशा स्थितीत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्यासमोर आपला बालेकिल्ला राखण्याचे आव्हान आहे, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी यांचीही खरी कसोटी आहे.












Click it and Unblock the Notifications