Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra HSC Results 2025 declared : बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 91.88 टक्के लागला

Maharashtra HSC Results 2025 declared : महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ एचएचसी, बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा निकाल 91.88 टक्के लागला आहे.

आज बारावीच्या निकालाच्या अनुशंगाने शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये ही सर्व माहिती देण्यात आली आहे. राज्यात सर्वाधिक निकाल कोकण मंडळाचा लागला आहे. कोकण मंडळात 96.74 टक्के लागला आहे.

Maharashtra HSC Results 2025 declared

किती झाले उत्तीर्ण किती झाले अनुत्तीर्ण

राज्यात बारावी परिक्षेसाठी १४ लाख २७ हजार ८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १३लाख २ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात राज्याचा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे.

Take a Poll

निकालातील महत्वाचे मुद्दे, निकालात मुलींची बाजी

  • बारावीच्या निकालात ९४.५८ टक्के मुली तर ८९.५१ टक्के मुलं पास झाली आहे. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.
  • एकही विद्यार्थ्यांने पैकीच्या पैकी अर्थात शंभर टक्के गुण यंदा मिळवलेले नाही.
  • बारावीच्या निकालात यावर्षी घट झाली आहे. गेल्या वर्षी हा निकाल ९३.३७ टक्के लागला होता.
  • गेल्या वर्षीपेक्षा यंदा १.४९ टक्क्यांनी निकालात घट झाली आहे.
  • यंदा ३८ कॉलेजचा निकाल शून्य टक्के

विभागनिहाय निकाल जाणून घ्या

  • विभागनिहाय निकाल २०२५
  • कोकण -९६.७४
  • कोल्हापूर ९३.६४
  • मुंबई - ९२.९३
  • संभाजीनगर - ९२.२४
  • अमरावती - ९१.४३
  • पुणे -९१.३२
  • नाशिक -९१.३१
  • नागपूर - ९०.५२
  • लातूर - ८९.४६

कला शाखा

नोंदणी - ३ लाख ५४ हजार ६९९. परीक्षेला बसले ३ लाख परीक्षेला बसले - ४९ हजार ६९६
उत्तीर्ण - २ लाख ८१ हजारह ६०६
टक्केवारी - ८०.५२ टक्के

वाणिज्य विभाग

नोंदणी - ३ लाख ७६६
परीक्षेला बसले - २ लाख ९९ हजार ५२७
उत्तीर्ण - २ लाख ७७ हजार ६२९
टक्केवारी - ९२.६८

विज्ञान शाखा

नोंदणी - ७ लाख ३७ हजार २०५
परीक्षेला बसले - ७ लाख ३५ हजार ३
उत्तीर्ण - ७ लाख १५ हजार ५९५ पास झाले.
टक्केवारी - ९७.३५ टक्के

किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम

नोंदणी - ३० हजार १७
परीक्षेला बसले - २९ हजार ३६३
उत्तीर्ण - २४ हजार ४५०
टक्केवारी - ९३.२६

असा बघा तुमचा निकाल

  • सर्वात आधी mahresult.nic.in ला भेट द्या.
  • त्यानंतर "महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025" लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा हजेरी नंबर आणि आईचे नाव (प्रवेशपत्रानुसार) त्यामध्ये भरा. "निकाल पहा" यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा महाराष्ट्र बोर्ड निकाल 2025 तुम्हाला दिसेल.
  • निकाल तुमचाच आहे का हे याची पडताळणी करा.
  • यानंतर
  • पुढच्या शैक्षणिक प्रक्रियेसाठी आणि भविष्यासाठी निकाल डाऊनलोड करा, स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही प्रिंटही काढू शकता.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+