Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरपरिस्थिती, पुरग्रस्त भागात शाळांना सुट्टी

मुंबई : राज्यातील अनेक जिल्हात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. पुणे, सातारा, रायगड, पालघर, सांगली या जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुणे, सांगलीत पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Pune Rains

कोल्हापुरातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फुटांवर गेली आहे. राधानगरी धरण देखील 98 टक्के पेक्षा जास्त भरले आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज उघडण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक जिल्हा आणि राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

6:18 PM, 14 Aug

testing
5:45 PM, 25 Jul

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुरग्रस्त भागाला भेट

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहरातील एकता नगर आणि विठ्ठल नगर येथील पूरग्रस्त भागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
4:31 PM, 25 Jul

पुण्यात मुसळधार पाऊस

लवासामध्ये भूस्खलनाच्या ठिकाणी एनडीआरएफची एक टीम पोहोचली आहे. भूस्खलनाच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्याला काही तडे गेले आहेत.
4:29 PM, 25 Jul

पुणे मुसळधार पाऊस

पुण्यात विजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या तिघाच्या कुटूंबाना 5 लाखाची मदत
4:27 PM, 25 Jul

पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील मोरया गोसावी गणपती मंदिर पावसामुळे पाण्याखाली
2:59 PM, 25 Jul

पुणे शहरात मुसळधार पाऊस

पुणे शहरात मुसळधार पाऊस पडत असल्याने अग्निशमन विभागाने आज पुणे शहरातील निंबजनगर परिसरात अडकलेल्या 70 जणांची सुटका केली.
2:49 PM, 25 Jul

मुंबईसाठी रेड अलर्ट

प्रादेशिक हवामान केंद्राकडून आज मुंबई , पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी 'रेड' अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग आणि मुंबई जिल्ह्यात 26 जुलैला ‘ऑरेंज’ अलर्ट.
2:39 PM, 25 Jul

मुंबईसाठी रेड अलर्टचा इशारा

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी रेड अलर्टचा इशारा दिला आहे. हे लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
1:02 PM, 25 Jul

मुंबईत मुसळधार पाऊस

मुंबई | मुंबईत मुसळधार आणि सतत पाऊस पडत असल्याने वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सजवळील वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे
12:53 PM, 25 Jul

बारावीच्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होणार

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं ट्टिट
12:19 PM, 25 Jul

मुंबईत सकाळपासून पाऊस कोसळतोय

उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे,कल्याण नगर महामार्गावरील रायते पुल गेला पाण्याखाली. रायते पूल वाहतुकीसाठी बंद.
12:03 PM, 25 Jul

कोल्हापूर-

राधानगरी धरण शंभर टक्के भरलं, धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले
12:00 PM, 25 Jul

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रशासनाला सुचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर बोलून त्यांना जिल्ह्यातील पाऊस आणि पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले.
11:58 AM, 25 Jul

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यातील पुरपरिस्थीतीचा आढावा

सर्वांनी फिल्डवर उतरा, आवश्यक असेल तर नागरिकांना एयरलिफ्ट करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रशासनाला सुचना
11:55 AM, 25 Jul

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुरपरिस्थितीचा आढावा

पुर परिस्थितीच्या ठिकाणी शाळा, महाविद्यालय,कार्यालयांना सुट्टी
11:50 AM, 25 Jul

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यातील पुरपरिस्थितीचा आढावा

नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवा, त्यांना सर्व सुविधा द्या, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
11:42 AM, 25 Jul

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस

पुण्यातील लवासा सिटीत दरड कोसळली, या दरडीमध्ये तीन बंगले गाडले गेल्याची माहिती समोर येत आहे.
11:40 AM, 25 Jul

मुंबई उपनगरात रात्रीपासून मुसळधार पाऊस

अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याने वाहतूकीसाठी बंद
11:33 AM, 25 Jul

पुण्यात पुरपरिस्थिती

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार मुंबईतून पुण्याकडे रवाना.
11:28 AM, 25 Jul

कोल्हापूर

राधानगरी धरण 100 टक्के भरलं, एक स्वयंचलित दरवाजा उघडला.
11:26 AM, 25 Jul

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस

पुण्यात एनडीआरएफच्या तीन तुकड्या एकता नगर आणि सिंहगड रोड येथे दोन टीम आणि वारजे येथे एक टीम तैनात.
11:24 AM, 25 Jul

उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली

रात्रीपासून कोसळत असलेल्या पावसामुळे कल्याण ग्रामीण भागातून वाहणाऱ्या उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11:13 AM, 25 Jul

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस

पुण्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस, पहाटे घरात पाणी शिरल्याने धान्य आणि इतर साहित्यांचे मोठं नुकसान
11:10 AM, 25 Jul

पुण्यात मुसळधार पाऊस

पुण्यातील निंबजनगर परिसरात बोटीच्या साह्याने नागरिकांनी सुरक्षित काढण्यात येत आहे.
11:07 AM, 25 Jul

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस

ओंकारेश्वर मंदीर पाण्याखाली,परिसरातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत
10:57 AM, 25 Jul

मुंबईतील पावसाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने अपडेट

"मुसळधार पावसामुळे मुंबईला जाणारी आणि जाण्यासाठीची उड्डाणे प्रभावित होऊ शकतात. प्रवाशांना विमानतळासाठी लवकर वेळेच्या आधी येण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण संथ रहदारी आणि पाणी साचल्याने वाहतूक विलंब होऊ शकतो."
10:54 AM, 25 Jul

रायगड-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळली

रायगड-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने ढिगारा हटेपर्यंत या घाट मार्गावरील वाहतूक ठप्प : रायगड पोलीस
10:53 AM, 25 Jul

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुरपरिस्थीतीचा आढावा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मुख्यालयात जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या मुसळधार पावसानंतर परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख यांच्याशीही मदत उपाययोजनांबाबत चर्चा केली. अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या खडकवासला आणि पिंपरी चिंचवड भागातील बाधितांना आवश्यक ती सर्व मदत देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
10:51 AM, 25 Jul

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस

महाराष्ट्र: पुण्यातील मुसळधार पावसावर, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे म्हणाले, "पश्चिम घाटातील पुण्यातील डोंगराळ भागात मुसळधार पाऊस पडत आहे... आम्ही सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे आणि आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.
10:50 AM, 25 Jul

राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरपरिस्थिती

राज्यातील पुरपरिस्थीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा.
READ MORE

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+