लाडकी बहीण' योजनेनंतर महाराष्ट्रात आता 'लाडका भाऊ' स्किम! जीआर लागू, कसा घ्यायचा लाभ घ्या जाणून

मुंबई - राज्य सरकारने अर्थसंकल्पात 'लाडकी बहीण' ही महत्त्वकांक्षी योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार महिलांना दर महिना दीड हजार तर वर्षाला 18 हजार रुपये मिळणार आहेत. या घोषणेनंतर विरोधकांकडून लाडक्या भावाचे काय? असा प्रश्न राज्य सरकारला विचारत टीका केली होती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाडक्या भावासाठी देखील एखांदी योजना जाहीर करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आता लाडका भाऊ योजनाही आली आहे.

जीआर निघाला

'लाडका भाऊ' योजनेचा जीआर काढण्यात आला आहे. ज्यामध्ये राज्यातील तरुणांना सरकार कोणत्या योजनेअंतर्गत पैसे देणार हे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे.

Ladka Bhau Yojana

रोजगार उपलब्ध होणार

या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवारांनी रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जाणार आहेत. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळेल आणि त्यांची क्षमता वाढेल. उद्योजकांनाही त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाच्या संकेत स्थळावर सुलभतेने नोंदणी करणार आहेत.

योजनेबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुख्यमंत्र्यांनीविरोधकांच्या आक्षेपाला उत्तर देताना सांगितले की, 'लाडक्या बहिणीसाठी योजना आणलीत, आता लाडक्या भावांचं काय? असं प्रश्न काही जणांनी विचारला होता. लाडक्या भावांकडेही आमचं लक्ष आहे, असं मला त्यांना सांगायचं आहे. आम्ही त्यांच्यासाठी देखील योजना आणलीय. 12 वी पास तरुणांना 6 दरमहा 6 हजार, डिप्लोमा झालेल्या तरुणाला 8 हजार तर पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिना मिळतील.

अनुभवाच्या जोरावर मिळेल नोकरी

या योजनेतील तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करेल, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल. या योजनेनुसार राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील अप्रेन्टिसशिप करतील तिथे त्यांच्यासाठी आपलं सरकार पैसे भरणार आहे. त्याचबरोबर त्यांना स्टायपंड देईल. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशा प्रकारची योजना आणली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता....

  • उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल वय 35 वर्ष असावे
  • उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास /आयटीआय/ पदविका /पदवी/ पदवी पदवीत्तर असावी . मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
  • उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी/ रहिवासी असावा.
  • उमेदवाराची आधार नोंदणी असावी.
  • उमेदवाराचे बँक खाते आधार लिंक असावे.
  • उमेदवारांनी कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.

लाडका भाऊ योजनेअंतर्गत मिळणार दरमहा एवढे पैसे

  • 12 वी उत्तीर्ण -दरमहा 6 हजार
  • डिप्लोमा झालेल्या तरुण -दरमहा दहा हजार रुपये
  • पदवीधर तरुण- दरमहा दहा हजार रुपये.

लाडका भाऊ योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रं आवश्यक?

  • आधार कार्ड
  • निवास प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • वय प्रमाणपत्र
  • चालक परवाना
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
  • बँक खाते पासबुक
  • ई-मेल आयडी

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची व्याप्ती मोठी असून यामध्ये कार्य प्रशिक्षण कालावधी सहा महिन्याचा असणार आहे. उद्योग क्षेत्रात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे उमेदवारांना रोजगारक्षम करून उद्योगाकरिता कुशल मनुष्यबळ तयार करणार आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात दहा लाख कार्य प्रशिक्षणच्या संधी उपलब्ध होणारा असून या योजनेत प्रत्येक ग्रामपंचायत साठी एक व शहरी भागात 5000 लोकसंख्येसाठी एक असे एकूण 50 हजार योजना दूत नेमणार आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+