पुणे विमानतळ आता 'जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ' नावाने ओळखले जाणार, राज्यसरकारची मंजुरी
Pune airport to be rename Jagadguru Sant Tukaram Maharaj Airport : पुणे विमानतळाचे ' जगतगुरू संत तुकाराम महाराज विमानतळ' असे नामकरण करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने सोमवारी अधिकृत मान्यता दिली. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात एका कार्यक्रमात याबद्दल माहिती दिली होती. तर आजच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचं नाव पुणे विमानतळाला देण्यात यावे, अशा मागणीचा प्रस्ताव पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनीसरकारला दिला होता, तो आम्ही स्वीकारला आहे. येत्या कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळेल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज ते पुण्यात पालखी मार्ग भूमीपूजन सोहळ्यात बोलत होते. त्यानंतर दुपारून मंत्रिमंडळाची बैठक झाली, यात या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस पुण्यात बोलताना म्हणाले होते की, नवीन विमानतळ तयार करण्यात येणार आहे, त्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यायचं आहे. पंरतु पुण्यात जे विमानतळ आहे, जे नव्या पद्धतीने बनवण्यात आलं आहे, त्याचं नामकरण जगदगुरू तुकाराम महाराजांच्या नावाने व्हावे, अशी संकल्पना खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मांडली होती. त्यावर तात्काळ काम आम्ही सुरू केलेले आहे. कॅबिनेट बैठकीनंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार आहोत. त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करून घेण्याची जबाबदारी मुरलीधर मोहोळ आणि नितीन गडकरी यांची असेल असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
कोण आहेत संत तुकाराम महाराज?
संत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत - कवी होते. त्यांचा जन्म देहु या गावात वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी 'जगद्गुरू' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - 'पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात. जगद्गुरू तुकाराम लोककवी होते. 'जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा!' अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला.












Click it and Unblock the Notifications