Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दिवाळीआधी तुमच्या खात्यात येणार 7 हजार रुपये, कोणत्या योजनेअंतर्गत अन् लाभ नेमका कुणाला मिळणार? वाचा

Maharashtra government schemes : सहा दिवसांवर विजयादशमी दसऱ्याचा सण येऊन ठेपलाय. अन् पुढच्या महिन्यात दिवाळी आहे. पण या दिवाळीच्या सणाआधी तुम्हाला एक दोन नव्हे चक्क सात हजार रुपये मिळू शकतात. होय तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरंय.

राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते, त्यामुळे सरकारने विविध लोकाभिमुख निर्णयांचा धडाका लावला आहे. जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या जात आहेत, ज्यामुळे आर्थिक लाभ मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सरकारतर्फे अनेक शेतकरी आणि महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जात आहे. यामुळे काही भाग्यवान कुटुंबांना दिवाळीपूर्वी 7000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो.

Maharashtra government schemes

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना - 3000 रुपये

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना बँक खात्यात 3000 रुपये जमा केले जात आहेत. राज्य सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे महिलांना 3000 रुपयांचा लाभ मिळेल.

पीएम शेतकरी सन्मान निधी योजना - 2000 रुपये

केंद्र सरकारच्या पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम येथे या हप्त्याच्या वितरणास सुरुवात झाली आहे, त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार आहेत.

नमो शेतकरी महासन्मान योजना - 2000 रुपये

राज्य सरकारने पीएम शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपये वर्षाला दिले जातात, त्यापैकी 2000 रुपयांचा हप्ता यावेळी वितरित केला जाणार आहे.

7000 रुपये मिळण्याची संधी

या तीन योजनांचे लाभ एकाच कुटुंबात एकत्रित झाल्यास, संबंधित कुटुंबाला एकूण 7000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो. म्हणजेच, एखाद्या कुटुंबात शेतकरी असून त्या कुटुंबातील महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असेल, तसेच पीएम सन्मान आणि नमो योजनेचेही लाभार्थी असतील, तर या कुटुंबाला एकूण 7000 रुपये मिळू शकतात. अशा लाभार्थी कुटुंबांना दिवाळीच्या आधीच आर्थिक लाभ मिळणार आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+