11वीसाठी आतापर्यंत आले तब्बल 'एवढे' अर्ज! प्रवेश फार्म भरताना या 7 गोष्टी ध्यानात ठेवा काम होईल सोपे
Maharashtra fyjc admissions 2025 : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी 26 मे 2025 पासून नोंदणी सुरु झाली असून राज्यातील सुमारे दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी काल पहिल्या दिवशी नोंदणी केली.
यंदा प्रथमच संपूर्ण राज्यात एकाचवेळी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रीया राबवली जात आहे. अकरावी प्रवेशासाठी यंदा महाराष्ट्रातील 9 हजार 281 कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयात एकूण 20 लाख 43 हजार 254 जागा आहेत.

विज्ञान शाखेसाठी 8 लाख 52 हजार 206 जागा आहेत, वाणिज्य शाखेसाठी 5 लाख 40 हजार 312 जागा आहेत, तर कला शाखेत 6 लाख 50 हजार 682 जागा आहेत. वाणिज्य शाखेसाठी विज्ञान आणि कला शाखेच्या तुलनेत वाणिज्य शाखेच्या जागा कमी आहेत. या जागांसाठी काल जवळपास दोन लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली तर आजही दीड ते दोन लाख विद्यार्थी नोंदणी करु शकतात.
दीडशे करिअर आणि इतर कोर्सची माहिती
शिक्षण विभागाने यंदा प्रथमच अकरावी प्रवेशासाठी अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी करीअर क्षेत्रासंबंधित माहिती उपलब्ध करुन दिली आहे. यामध्ये स्मार्ट फोन दुरुस्ती, फॅशन डिझाईन, चित्रपट मार्केटींग, कॅलिग्राफी, रेडीओ जाॅकी, सीएस, भारतीय प्रशासकीय शेव आदी दीडशे करीअर क्षेत्र आणि अभ्यासक्रम पात्रता आणि कामाचे स्वरुप याची माहिती देण्यात आली आहे.
'या' 7 गोष्टी तुम्हाला फार्म भरताना सहाय्य करतील..
1. अर्जात भरलेल्या माहितीची व अर्जदारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी प्रवेशावेळी केली जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज ऑनलाईन भरावा व पुन्हा एकदा स्वतः तपासून प्रमाणित करावा.
2. विद्याथ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज शक्यतो स्वतः पालकांच्या मदतीने भरावा. इतर ठिकाणाहून अर्ज भरल्यास त्यामध्ये अपूर्णता त्रुटी राहू शकतील व त्यामुळे तुमच्या प्रवेश प्रक्रियेत अडथळा येऊ शकेल.
3. प्रवेश अर्ज सादर (Submit/Lock) केल्यानंतर त्याची एक छापील प्रत (Print out) विद्यार्थ्यांने स्वतःकडे घेऊन ठेवावी. वावरून विद्यार्यास अर्जात भरलेली माहिती पुन्हा पडताळून पाहता येईल.
4. अधिक माहितीसाठी वेबपोर्टलवर देण्यात आलेल्या टोल फ्री हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा. शंकांचे निरसन न झाल्यास आपल्या शाळेची अथवा मार्गदर्शन केंद्राची मदत घ्या किंवा आपली अडचण वेब पोर्टलवर विद्यार्थी लॉगीन मध्ये शंका समाधानमध्ये नोंदवा.
5. विद्यार्थ्यांची पुस्तिकेत दिलेल्या माहितीचा व्यवस्थित आकलन करून आपणास हवे असलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे शाखेचे नाव सांकेतांक (Code Numbers) प्रवेश अर्जात अचूक भरा. ऑनलाईन प्रवेश अर्ज भाग-1 व भाग-2 संपूर्ण भरून झाल्यावर Submit/Lock करण्यापूर्वी अर्जाची पुन्हा एकदर पडताळणी करा.
6. एकापेक्षा अधिक प्रयत्नात इयत्ता 10 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या Repeater विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरताना त्यांच्या वेळोवेळी उत्तीर्ण झालेल्या विषवांच्या गुणांची बेरीज करून एकूण गुण अचूक नोंदवावेत. अनुत्तीर्ण असलेल्या विषयांचे गुण नोंदवू नयेत.
7. प्रवेश अर्ज भाग-2 मध्ये योग्य पसंतीक्रम भरा, तेच ते पसंतीक्रम व देता सर्व बाबीचा विचार करून योग्य पसंती नोंदवा.












Click it and Unblock the Notifications