अकरावीचा प्रवेश अर्ज Online भरताना समस्या आल्यास काय करायचे? कुठे संपर्क करायचा, वाचा A टू Z माहिती
Maharashtra fyjc admission 2025 helpline number : अकरावी प्रवेशासाठी सध्या फार्म भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. अशा स्थितीत अनेकांना तांत्रिक अडचणी येत आहेत, 26 मे रोजी नव्याने प्रवेशासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली. यादरम्यान, विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी आल्या, यामुळे त्यांना आणि त्यांच्या पालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणीमुळे अर्ज करण्यास विलंब होत असून प्रवेशासाठी अर्ज प्रक्रीयेत दोन टप्पे आहेत. पहिल्या भागात वैयक्तिक माहिती भरायची असून दुसऱ्या भागात निवडीचा पसंती क्रमांक भरायचा आहे, पण पुन्हा एकदा संकेतस्थळ संथ आणि अस्थीर झाल्याने काही विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरता आला नाही. वेबसाईटचे पेज अनेकवेळा उघडत नसल्याचे समोर आले आहे.

तुम्हाला जर अर्ज भरण्यासाठी समस्या आल्या अथवा प्रवेश प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणी आल्या तर खालील गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत, आपल्याला येथे संपर्क करुन या समस्या सोडवता येऊ शकतील.
फार्म भरताना अडचणी आल्या तर हे करा...
- जर तुम्हाला प्रवेश प्रक्रियेत काही अडचण आली, अथवा फाॅर्म अपलोड झाला नाही किंवा तांत्रिक समस्या आल्या तर त्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने 8530955564 या क्रमांकावर संपर्क करा.
- संचलनालयाने ही सुविधा दिली आहे. सकाळी नऊ ते संध्याकाळी सातपर्यंत तुम्ही तुमच्या समस्या मांडू शकता.
- जर समस्या असतील तर तुमच्यासाठी 18003132164 या हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे, त्यावरही तुम्ही सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत काॅल करु शकता या वेळेत तुमची मदत केली जाईल.
- हेल्पलाईन क्रमांकाशिवाय [email protected] येथेही तुम्ही संपर्क करु शकता.
अर्ज भरताना या गोष्टी खूप महत्वाच्या
अर्जात भरलेल्या माहितीची व अर्जदारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी प्रवेशावेळी केली जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज ऑनलाईन भरावा व पुन्हा एकदा स्वतः तपासून प्रमाणित करावा.
विद्याथ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज शक्यतो स्वतः पालकांच्या मदतीने भरावा. इतर ठिकाणाहून अर्ज भरल्यास त्यामध्ये अपूर्णता त्रुटी राहू शकतील व त्यामुळे तुमच्या प्रवेश प्रक्रियेत अडथळा येऊ शकेल.
प्रवेश अर्ज सादर (Submit/Lock) केल्यानंतर त्याची एक छापील प्रत (Print out) विद्यार्थ्यांने स्वतःकडे घेऊन ठेवावी. वावरून विद्यार्यास अर्जात भरलेली माहिती पुन्हा पडताळून पाहता येईल.
अधिक माहितीसाठी वेबपोर्टलवर देण्यात आलेल्या टोल फ्री हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा. शंकांचे निरसन न झाल्यास आपल्या शाळेची अथवा मार्गदर्शन केंद्राची मदत घ्या किंवा आपली अडचण वेब पोर्टलवर विद्यार्थी लॉगीन मध्ये शंका समाधानमध्ये नोंदवा.
विद्यार्थ्यांची पुस्तिकेत दिलेल्या माहितीचा व्यवस्थित आकलन करून आपणास हवे असलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे शाखेचे नाव सांकेतांक (Code Numbers) प्रवेश अर्जात अचूक भरा. ऑनलाईन प्रवेश अर्ज भाग-1 व भाग-2 संपूर्ण भरून झाल्यावर Submit/Lock करण्यापूर्वी अर्जाची पुन्हा एकदर पडताळणी करा.
एकापेक्षा अधिक प्रयत्नात इयत्ता 10 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या Repeater विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरताना त्यांच्या वेळोवेळी उत्तीर्ण झालेल्या विषवांच्या गुणांची बेरीज करून एकूण गुण अचूक नोंदवावेत. अनुत्तीर्ण असलेल्या विषयांचे गुण नोंदवू नयेत. प्रवेश अर्ज भाग-2 मध्ये योग्य पसंतीक्रम भरा, तेच ते पसंतीक्रम व देता सर्व बाबीचा विचार करून योग्य पसंती नोंदवा.
-
महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल! जिष्णू देव वर्मा यांच्याकडे राज्याची धुरा; वाचा त्यांच्याबद्दल -
सचिन तेंडुलकरांच्या कुटुंबात सनईचौघडे! अर्जुन-सानियाचा शाही विवाह सोहळा संपन्न; दिग्गजांची मांदियाळी -
राज्यसभेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर! महाराष्ट्रातील 'या' दिग्गज नेत्यांना संधी! वाचा विजयाचे गणित -
बिहारमध्ये 'निशांत' पर्व?, CM नितीश कुमार यांच्या मुलाची राजकीय एंट्री, 50व्या वर्षीही अविवाहित का? -
बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप?, नितीश कुमार CMपदाचा राजीनामा देणार?, नेमकं काय घडलं! -
T20 World Cup 2026 : वानखेडेवर 'हाय-व्होल्टेज' ड्रामा! इंग्लंड टॉस जिंकला; भारताला फलंदाजीचे आव्हान -
अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराची तयारी; 'मशहद'मध्ये दफनविधी, कोण कोण होणार सामील? -
हॉर्मुझच्या समुद्रात ट्रम्पंची एन्ट्री! जागतिक अर्थव्यवस्थेची 'लाईफलाईन' वाचवण्यासाठी 'हा' प्लॅन -
इराणच्या शक्तिशाली घराण्यातील गुप्त संघर्ष: मोजतबा खामेनींचे वैयक्तिक आयुष्य अन् सर्वोच्च नेतेपदाची -
Stocks To Buy : 2026 मध्ये 'हे' 5 शेअर्स तुम्हाला बनवतील मालामाल! पाहा CLSA ने दिलेली टार्गेट प्राईज -
वानखेडेवर टीम इंडियाचा धमाका! इंग्लंडचा पराभव करत भारत चौथ्यांदा T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला -
बिहारमध्ये 'निशांत' पर्व?, CM नितीश कुमार यांच्या मुलाची राजकीय एंट्री, 50व्या वर्षीही अविवाहित का?











Click it and Unblock the Notifications