Maharashtra Exit Polls : चाणक्यचा एक्झिट पोल- पुन्हा महायुतीच येणार, वाचा कुणाला किती जागा मिळणार
Maharashtra Exit Polls Result 2024 india today Chanakya C Voter Exit Poll Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी मतदान संपले आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 58.22 टक्के मतदान झाले. ही मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध संस्थांच्या एक्झीट पोल समोर येत आहेत. यामध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार, याबद्दल संकेत मिळत आहेत.
चाणक्य एक्झिट पोलच्या अंदाजानुसार यंदाच्या निवडणुकीत महायुतीची सरशी होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महायुतीला 152 ते 160 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागांवर विजय मिळणार आहे. तर अपक्षांना 6 ते 8 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज चाणक्यच्या एक्झिट पोलने वर्तवविला आहे.

भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार?
चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. भाजपला 90 जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर शिंदे गटाला 48 जागा आणि अजित पवार गटाला 22 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. तर महायुतीसोबत असलेल्या सहयोगी उमेदवारांना 2 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाला 35च्या जवळपास जागा मिळणार?
दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस 63 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरेल. या निवडणुकीत ठाकरे गटाला 35 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळू शकतो. तर 40 जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार विजयी ठरतील. तर या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांना मिळून 6 ते 8 जागांवर विजय मिळण्याची अंदाज चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आली आहे.
राज्यातील अन्य एक्झिट पोल्सचे निकाल खालीलप्रमाणे
1. पोल डायरी
महायुती - 122-186
भाजप - 77-108
शिवसेना (शिंदे गट) - 27-50
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 18-28
महाविकास आघाडी - 69-121
काँग्रेस - 28-47
शिवसेना (ठाकरे गट) - 16-35
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 25-39
इतर - 12-29
2. चाणक्य एक्झिट पोल
महायुती 152 ते 160 जागा
भाजप-90
शिंदे गट- 48
अजित पवार गट-22
महाविकास आघाडी 130 ते 138 जागा
काँग्रेस-63
ठाकरे गट-35
शरद पवार गट-40
1. इलेक्टोरल एज
भाजप-78, काँग्रेस-60, शरद पवार गट-46, ठाकरे गट-44, शिंदे गट-26, अजित पवार गट-14, इतर-20
अपक्षामध्ये - 6 ते 8












Click it and Unblock the Notifications