Maharashtra Exit Poll 2024: एक्झिट पोलमध्ये एकनाथ शिंदेचं आघाडीवर, उध्दव ठाकरे फेल ?
Maharashtra Exit Poll 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी काल ता. 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. त्यानंतर लगेच सायंकाळी एक्झिट पोल समोर आले आहेत. एक्झिट पोलनुसार यावेळी महाराष्ट्रात उध्दव ठाकरे गटाच्या अडचणी वाढताना दिसत आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनाने या निवडणूकीत बाजी मारली आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे, एनसीपी अजित पवार) आघाडीवर आहे.
मेट्रिसच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 89 ते 101 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिवसेनेला 37 ते 45 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 17 ते 26 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचवेळी काँग्रेस 39 ते 47, शिवसेना उध्दव ठाकरे गट 21 ते 29 आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 35 ते 43 जागा जिंकू शकते,असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रत्येक एक्झिट पोलमध्ये उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला अधिक जागा दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे एक्झिट पोलनुसार एकनाथ शिंदेंची शिवसेना आघाडीवर दिसून येत आहे.

यावेळी महायुतीचा घटक असलेल्या भाजपाने 152 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. तर महाविकास आघाडीत सर्वाधिक 101 जागांवर कॉंगेसने निवडणूक लढवली. एकीकडे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना 80 जागांवर निवडणूक लढवत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 96 जागांवर उमेदवार उभे केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 52 तर शरद पवार गटाला 87 जागा देण्यात आल्या.
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील परिस्थिती
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने 105 जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या. राष्ट्रवादीने 54 जागा जिंकल्या तर काँग्रेसने 44 जागा जिंकल्या होत्या. इंडिया टुडे-ॲक्सिसने एनडीएतील शिवसेना आणि भाजपसाठी 166-194 जागा आणि युपीए काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी 72-90 जागांचा अंदाज वर्तवला होता.
न्यूज18-आयपीएसओएसने एनडीएला 243 जागा आणि यूपीएला 41 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली होती. रिपब्लिक-जन की बात ने एनडीएला 216-230 जागा आणि यूपीएला 52-59 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली होती. टाईम्स नाऊने एनडीएला 230 आणि यूपीएला 48 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली होती. एबीपी न्यूज-सी व्होटरने एनडीएला 204 जागा आणि यूपीएला 69 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली होती.












Click it and Unblock the Notifications