Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राज्यात महायुतीच्या त्सुनामीपुढे 'या' दिग्गजांचे झाले पराभव; वाचा कुठे काय झाले...

Maharashtra Assembly Election Result 2024-राज्यात महायुतीची त्सुनामी लाट दिसत असून, आत्तापर्यंत आलेल्या निवडणूक निकालांमध्ये काँग्रेसह अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. राज्यात झालेल्या २८८ जागांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज सकाळपासून जाहीर होऊ लागले. त्यात महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार, हे स्पष्ट झाले आहे. विरोधातील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जबरदस्त धक्का बसल्याचे दिसत आहे. यंदाच्या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा शंभरी गाठत भाजपने आपली ताकद पुन्हा दाखवली आहे. नेमके कोणते दिग्गज पराभूत झाले ते आपण पाहू...

Prithviraj Chavan

पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालाय. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध भाजपचे अतुल भोसले अशी लढत झाली. त्यात अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव केला आहे. कराड दक्षिणमध्ये 17 व्या फेरीनंतर अतुल भोसले यांनी 38 हजार मतांचा लिड मिळवला होता. पृथ्वीराज चव्हाण यांना हा लीड तोडण्यात अपयश आलंय.

यशोमती ठाकूर यांचाही पराभव

काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. तिवसा विधानसभा मतदारसंघात भाजपने यशोमती ठाकूर यांच्याविरोधात राजेश वानखेडे यांना उमेदवारी दिली होती. राजेश वानखेडे यांच्याकडे 21 फेऱ्यांनंतर 8195 मतांचा लीड होता. तो लीज यशोमती ठाकूर यांना तोडता आला नाही.

बाळासाहेब थोरात यांचा पराभव

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. संगमनेर मतदारसंघातून बाळासाहेब थोरात सातव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, यावेळी मतदारांनी त्यांचा आमदार बदलला. बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडून अमोल खताळ यांना उमेदवारी देण्यात आली होती. अमोल खटाळ यांनी थोरातांचा 10 हजार 560 मतांनी पराभव केला.

धीरज देशमुख यांचा पराभव

लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख यांचा पराभव झाला आहे. भाजपचे रमेश कराड यांनी त्यांना पराभवाची धूळ चारली. धीरज देशमुख यांच्यासाठी त्यांचे बंधू अभिनेते रितेश देशमुख हे प्रचाराला उतरले होते. मात्र तेथे काँग्रेसची जादू चालली नसल्याचे दिसले.

रोहिणी खडसे यांचा पराभव

मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार रोहिणी खडसे यांचा दुसऱ्यांदा पराभव झाला आहे. तेथे शिवसेनेच्या शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

अमित ठाकरे यांचाही पराभव

पहिल्यांदाच मुंबईच्या माहीम मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा पराभव झाला आहे. अमित ठाकरे यांच्याविरुद्ध शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत यांचे आव्हान होते. या लढतीत महेश सावंत यांनी बाजी मारली. शिवडी मतदारसंघातून मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांचाही पराभव झाला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+