Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

निकालाचे काऊंटडाऊन सुरु, सरकार स्थापन करण्यासाठी मिळणार फक्त 48 तास! नाहीतर राष्ट्रपती राजवट!

Maharashtra Election Result 2024 Countdown : राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुराळा उडाला, प्रचार झाला, मतदानही झाले आता महाराष्ट्राच्या महानिकालाचीच सर्वांना प्रतिक्षा आहे. या निकालाला केवळ 48 तास उरले आहेत. त्यानंतरचे 48 तासही महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हींसाठी मोठे आव्हानात्मक राहणार आहे. कारण सरकार कुणाचेही आले तरीही निकाल लागल्याच्या 48 तासांतच सरकार स्थापन करण्यासाठी वेळ मिळणार आहे. यावेळेत सरकार कोणत्याही स्थितीत स्थापन करणे आवश्यक आहे.

ज्यांना बहुमत किंवा ज्यांचे बहुमताएवढे आमदार विजयी होतील त्यांना सरकार स्थापन्याची संधी असेल पण त्यासाठी केवळ 48 तासांचाच त्यांच्यासाठी कालावधी हाती राहणार आहे.

Maharashtra Election Result 2024 Countdown

अपक्षांच्या हाती सत्तेच्या चाव्या गेल्या तर काय?

महाराष्ट्रात सध्या एक्झिट पोलचा कल महायुतीच्या बाजूने दिला असला तरीही दोन्ही पक्ष बहुमताच्या जवळ असतील अशी चिन्हे आहेत अशावेळी सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती असू शकतात. त्यावेळी पुन्हा एकदा हाॅटेल पाॅलिटीक्स रंगण्याची शक्यता आहे. हे हाॅटेल पाॅलिटीक्स एकनाथ शिंदेंनी ठाकरेंपासून बाजूला होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी रंगले होते.

सत्ता स्थापन करण्यासाठी 26 नोव्हेंबरला रात्री 12 वाजेची डेडलाईन

23 नोव्हेंबरला निकाल हाती येणार आहेत, पण महाराष्ट्रात कोणताही पक्ष जेव्हा सत्ता स्थापन करेल तेव्हा त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी 26 नोव्हेंबरला रात्री 12 वाजेची डेडलाईन असेल.

26 नोव्हेंबरला 12 वाजेपर्यंत सरकार स्थापन झाले नाही तर काय?

26 नोव्हेंबरला 12 वाजेपर्यंत सरकार स्थापन झाले नाही तर राज्यात राष्ट्रपती लागू शकते. कारण महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ हा 26 नोव्हेंबरपर्यंतच आहे. हा कार्यकाळ संपला म्हणजे विधानसभा विसर्जित होते अशा स्थितीत राष्ट्रपती राजवट लागू होते. महाराष्ट्रात सत्तेची चावी अपक्षांच्या हाती गेली तर सरकार स्थापन करणे सहज सोपे नाही, मनधरणी आणि नाराजीनाट्याचा सामना सरकार स्थापन करणाऱ्या पक्षाला करावा लागणार आहे, त्यातच मुख्यमंत्री पदी कोण असेल यासाठी किमान अर्धा-एक दिवस तरी बैठकीत जाणार आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

सध्या कुठलीही चर्चा नाही, परवा निकाल लागणार आहे. या निकालानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसू आणि चांगला निर्णय घेऊ असे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+