मतदार यादीत तुमचं नाव आहे की, नाही? मतदान केंद्र सापडत नाही तर कसं शोधायचं, ही आहे सोप्पी पद्धत
मतदान करताना अनेक मतदारांना त्यांचे मतदान केंद्र सापडत नाही, ना पत्ताही पुर्ण असतो. शहरात अशी समस्या मोठी येते अशा स्थितीत मतदान केंद्र जरी सापडलं तरी मतदार यादीत नाव आहे की, नाही हे मात्र समजत नाही. मग मतदान कसं करायचं हा प्रश्न आपल्यासमोर असतो. अशावेळी टेन्शन घेऊ नका. आम्ही काही सोप्या पद्धती तुम्हाला सांगणार आहोत.
मतदारयादीत नाव कसं शोधायचं अन् मतदान केंद्र कसं शोधायचं हे तुम्ही या लेखात समजून घेऊ शकता. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा आम्ही यात काही पद्धती दिल्या आहेत त्यामुळे तुम्हाला ही प्रक्रीया करणे सोपे जाईल.

मतदार यादीत नाव कसे शोधायचे?
केंद्रीय निवडणूक आयोगानं आता मोबाईलवर मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्र शोधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मतदान केंद्र शोधताना ऐन वेळी गोंधळ होऊ नये म्हणून आयोगानं हे पाऊल उचललं आहे. निवडणूक आयोगाच्या 'वोटर हेल्पलाइन' या अॅपवर तुम्हाला मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्र लगेच शोधता येणार आहे.
'वोटर हेल्पलाइन'असं शोधा मतदान यादीतील नाव आणि मतदान केंद्र
- सर्वांत आधी प्ले स्टोअरमधून 'वोटर हेल्पलाईन' हे अॅप डाऊनलोड करा.
- त्यानंतर तुम्ही नवीन युजर असाल, तर सर्वांत आधी न्यू युजरवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करा. किंवा तुम्ही गेस्ट युजर म्हणूनही लॉगिन करू शकता.
- लॉगिन केल्यानंतर वरच्या बाजूला तुम्हाला 'search your name in electoral roll' असा एक सर्च बॉक्स दिसेल. त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला मतदान यादीतील नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी चार पर्याय मिळतील.
- पहिला पर्याय म्हणजे तुम्ही मोबाईल क्रमांक टाकून तुम्ही तुमची माहिती मिळवू शकता किंवा तुम्ही मतदान कार्डावरील क्यूआर कोड स्कॅन करू शकता.
- तुमची वैयक्तिक माहिती भरून किंवा मतदान कार्डावरील EPIC क्रमांक भरून, तुम्हाला मतदान यादीतील नाव आणि मतदान केंद्र शोधता येईल.
खालील पर्यायातून तुम्ही तुमचे मतदारयादीतील नाव आणि मतदान केंद्र शोधू शकता
1. मोबाईल क्रमांक
पहिल्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य आणि मोबाईल क्रमांक भरावा लागेल. मोबाईल क्रमांक भरताच तुम्हाला एक ओटीपी प्राप्त होईल. तो ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, वय, पत्ता, मतदान यादीतील क्रमांक व मतदान केंद्र, अशी संपूर्ण माहिती मिळेल.
2. मतदान कार्डावरील क्यूआर कोड
मतदान कार्डवरील क्यूआर कोड स्कॅन करून, तुम्हाला थेट मतदान यादीतील क्रमांक आणि मतदान केंद्राबाबतची माहिती मिळेल.
3. वैयक्तिक माहिती
तुम्हाला पहिले दोन पर्याय वापरताना अडचण येत असेल, तर तुम्ही तिसरा पर्यायाचा वापरा. त्यासाठी 'search by details' यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव आणि आडनाव, तुमच्या वडील किंवा आईचे नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा व मतदारसंघ, अशी संपूर्ण माहिती भरावी लागेल. ही माहिती भरताच तुम्हाला तुमचे मतदान केंद्र आणि मतदार यादीतील क्रमांक मिळेल.
4. EPIC क्रमांक
तुम्ही EPIC क्रमांक भरूनही मतदान केंद्र आणि मतदार यादीतील क्रमांकाविषयी माहिती मिळवू शकता.
EPIC क्रमांक म्हणजे काय?
EPIC म्हणजे संख्या आणि अक्षरे यांचा एक गट आहे जो एखाद्या व्यक्तीची ओळख आणि नागरिकत्व सिद्ध करतो. हापोर्टेबल दस्तऐवज स्वरूपाचा एक भाग आहे जो सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान वापरला जाऊ शकतो आणि एखाद्या व्यक्तीचे निवासस्थान आणि वय पुरावा प्रमाणित करण्यासाठी तसेच हा क्रमांक जुन्या मतदार ओळखपत्र आवृत्तीमधील निवडणूक ओळख क्रमांकाप्रमाणेच आहे.












Click it and Unblock the Notifications