'माझ्या नावाचे डमी उमेदवार' EVM मशीनवर नावापुढं काळा डाग, ..तर कुणाला सोडणार नाही - रोहीत पवार
Maharashtra Election 2024 : कर्जत आणि जामखेड मतदारसंघात महाविकास आघाडीकडून रोहीत पवार आणि भाजपकडून राम शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. आज या मतदारसंघातील नानज बुथवर इव्हीएम मशीनवर रोहीत पवार आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्याच्या नावापुढे काळा डाग होता यासंदर्भात खुद्द रोहीत पवार यांनीच माहिती दिली आहे.
दरम्यान गेटवर कुणीही कुणाला अडवत नव्हते, पोलिस प्रशासन नव्हतं असा आरोपही त्यांनी केला आहे. "माझ्या नावाच्या डमी उमेदवारांच्या नावापुढं काळा डाग लावल्याचंही निदर्शनास आलं असून हा रडीचा डाव आहे. असंही रोहीत पवार यांनी म्हटलं आहे."

नेमकं काय म्हणाले रोहीत पवार?
रोहीत पवार म्हणाले, "सकाळी माझ्या मतदारसंघातील नान्नज आणि झिक्रीसह विविध बुथला भेट दिली असता तेथील परिस्थिती काय होती, याचा हा आढावा.. काही #EVM मशीनवर माझ्या विरोधकांच्या आणि माझ्या नावाच्या डमी उमेदवारांच्या नावापुढं काळा डाग लावल्याचंही निदर्शनास आलं असून हा रडीचा डाव आहे. हा काळा डाग हटवण्याची मागणी तेथील बुथ प्रमुखाकडं करण्यात आली. तसंच आमच्या मागणीनुसार मतदारसंघात संवेदनशील ठिकाणच्या बुथवर लावण्यात आले असून गरज पडल्यास हे सीसीटीव्ही फुटेज आम्ही मागवू शकतो. त्यामुळं हे CCTV कॅमेरे कायम सुरु राहतील, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, ही विनंती!"
सकाळी पोलिस नव्हते- रोहीत पवार
रोहीत पवारांनी आरोप केला की, या मतदारसंघावरील बुथवर सकाळी पोलिस नव्हते असे मला सांगण्यात आलं आहे. तेथील एक पीआय एका पक्षाचे काम करतो असे तेथील लोकांचे मत आहे. आता आम्ही प्रशानाला विनंती करुनही येथे चोख बंदोबस्त प्रशासनाकडून दिला जात नसेल तर त्याला आम्ही काय म्हणणार. एक गोष्ट प्रशासनाने आणि या सर्वांनी ध्यानात ठेवायला हवी की, माझ्या कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागला तर आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून आमच्या पातळीवर कुणालाही सोडणार नाही.
सकाळी माझ्या मतदारसंघातील नान्नज आणि झिक्रीसह विविध बुथला भेट दिली असता तेथील परिस्थिती काय होती, याचा हा आढावा.. काही #EVM मशीनवर माझ्या विरोधकांच्या आणि माझ्या नावाच्या डमी उमेदवारांच्या नावापुढं काळा डाग लावल्याचंही निदर्शनास आलं असून हा रडीचा डाव आहे. हा काळा डाग हटवण्याची… pic.twitter.com/BDpL7WDhm3
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 20, 2024
सामान्य,पदाधिकाऱ्यांना गुंड धमक्या देत आहेत
रोहीत पवार म्हणाले, आम्ही प्रशासनाला पत्र दिले की, या मतदारसंघातील काही बुथ संवेदनशील आहेत. तिथे अनेक गुंड आहेत, हद्दपार, मोक्का लागलेले गुंड आहेत, त्यांनी काही दिवसांत सामान्य लोक आणि आमच्या पदाधिकाऱ्यांना धमक्या दिल्या आहेत. गुंडांचा वावर येथे मोठ्या प्रमाणात आहेत, त्याचे पुरावे आम्ही दिले आहे असे असतानाही पोलिस प्रशासन अजून लक्ष देत नाही. लोकशाहीला धक्का दिला गेला तर येथे आम्ही कुणालाही सोडणार नाही.
अनुचित प्रकार. बुथ ताब्यात घेण्याचे प्रकार खपवून घेणार नाही
एखादा अनुचित प्रकार आणि अशा घटना घडल्या तर आम्ही त्यांना सोडणार नाही. बुथ जर कुणी ताब्यात घेऊ नये यासाठी सीसीटीव्ही सुरु ठेवा. उद्या प्रशासन सीसीटीव्ही बंद आहे असे म्हणेल, चालत नाही या गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही. काही मशीनवर माझ्या नावाचे डमी उमेदवार असून त्या नावापुढे काळा डाग लावला आहे. राम शिंदे माझे विरोधक आहेत त्यांच्या नावासमोरही काळा डाग आहे. यासंदर्भात आम्ही तक्रार केली आहे.
हेही वाचा : तुमच्या मतदारसंघात कोणता उमेदवार कुणाशी लढतोय? वाचा महाराष्ट्रातील 288 मतदारसंघातील उमेदवारांची यादी












Click it and Unblock the Notifications