Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra Din 2025 : महाराष्ट्र दिनाच्या 'अशा' हटके द्या शुभेच्छा, एक से बढकर एक मराठी मॅसेजेस

संपूर्ण जगभरात मराठी बांधव १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करतात. हा दिवस कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. १९६० साली याच दिवशी मुंबई प्रांतातून महाराष्ट्र व गुजरात स्वतंत्र झाले. त्यानंतर १ मे रोजी हा महाराष्ट्र दिन पाळण्यास सुरुवात झाली. मराठी भाषा, संस्कृती व हुतात्मांचा गौरव या दिवशी केला जातो. या विशेष दिवशी आपल्या प्रियजनांना व मित्र- मैत्रिणींना खास शुभेच्छा देण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. अशाच काही शुभेच्छा आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

Maharashtra Day Wishes

व्हाट्सअँप शुभेच्छा

- भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दांच्या देशा... जय जय महाराष्ट्र देशा

- बहु असोत सुंदर संपन्न की महा...प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

- शिव निष्ठा येथ असे सतत जागती...अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

- भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा

- जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी... गुणगुणलो जे गीत गीत मराठी... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

- अभिमान आहे मराठी असल्याचा माझ्या मातीचा माझ्या महाराष्ट्राचा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

- "कपाळी लावूनी केशरी टिळा नमन करितो तुला महाराष्ट्र देशा जय महाराष्ट्र"

- "ढोल ताश्याच्या गजरात व्हावा उत्सव उत्सव महाराष्ट्राचा, उत्सव माझ्या माय मराठीचा" महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

- "शौर्य, ज्ञान, बंधुता आणि समानता असे अष्टपैलू घेऊन जगणारे आणि जगवणारे माझे महान असे राष्ट्र, महाराष्ट्र... महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा... जय महाराष्ट्र..."

- मराठी मातीत रुजलेली भाषा, मराठी माणसाचा अभिमान! मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!

- आम्हाला अभिमान आहे, महाराष्ट्रीय असल्याचा, आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा, आम्ही जपतो आमची संस्कृती, आमची निष्ठा, महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..!

- महान संतांची जन्मभूमी, विज्ञानाने जेथे केली प्रगती प्रेम, आदर, स्नेह आणि माणुसकी हीच आहे आमची संस्कृती. महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..!

- जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी... गुणगुणलो जे गीत गीत मराठी... मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

- पुर्नजन्म घेतला तरी महाराष्ट्रात घेईन आणि या मातीत जन्मलेल्या वीरांसारखा शूरवीर होईन... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

- मंगल देशा, पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा....महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

- महाराष्ट्राची यशो गाथा, महाराष्ट्राची शौर्य कथा, पवित्र माती लावू कपाळी, धरणी मातेच्या चरणी माथा ...जय महाराष्ट्र ! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

- महाराष्ट्रदिन चिरायु होवो , सर्वांना मनापासून महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+