महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा; PM मोदींसह 22 राज्यातील प्रमुख येणार!
Mahayuti Oath Ceremony : महायुतीच्या वतीने राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला आहे. त्यानुसार आज (5 डिसेंबर) गुरुवार रोजी सायंकाळी 5.30 वाजता महायुतीचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडणार आहे.
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे शपथ घेणार आहेत. तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही याचा निर्णय अद्याप झालेला नाही. दरम्यान, फडणवीस यांनी बुधवारी रात्री त्यांची भेट घेऊन सरकारमध्ये सहभागी व्हावे, अशी विनंती केली. तर या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
जुनाच पॅटर्न असणार!
राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजप 132 जागा जिंकूण सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नव्या सरकारमध्ये जुनाच पॅटर्न कायम ठेवण्यात आला आहे. जुन्या पॅटर्ननुसार पुन्हा एकदा राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. आज देवेंद्र फडणवीस यांची भाजप पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झालेली आहे.

व्हायरल पत्रिकेवर फक्त मोदींचे नाव
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याच्या पत्रिका व्हायरल झालेली आहे. या पुत्रिकेमध्ये फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव आहे. आग्रहाचे निमंत्रण, विश्वगौरव मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री म्हणून श्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा आणि सन्मानीय उपमुख्यमंत्री तथा मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला आपण उपस्थित रहावं ही अग्रहपूर्वक विनंती. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश असा मजकूर या निमंत्रण पुत्रिकेवर छापण्यात आलेला आहे.
शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी
उद्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. मुंबईच्या आझाद मैदानात या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण
मिळालेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळ्यासाठी 22 राज्याचे उपमुख्यमंत्री देखील हजेरी लावणार आहेत. या सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार तब्बल 40 हजार लोक या सोहळ्यासाठी उपस्थित असणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications