आजपासून 11 वीची प्रवेशप्रक्रीया सुरू, अॅडमिशनची 'ही'आहे अंतीम तारीख, जाणून घ्या फार्म कसा भरायचा?
Maharashtra Class 11 admissions to begin from May 21 : दहावीचा निकाल लागल्यानंतर आता पुढील प्रवेशप्रक्रीयेला गती येत आहे. पाॅलिटेक्निकसाठी अर्जप्रक्रीया सुरु झाल्यानंतर आज 21 मे 2025 पासून अकरावीसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या काळात विद्यार्थ्यांना फार्म भरुन प्रवेशासाठी आवश्यक गोष्टी करणे क्रमप्राप्त आहे.
महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालय इयत्ता 11 वीची प्रवेश प्रक्रिया आज सकाळी 11 वाजता सुरू झाली आहे.त्यामुळे दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी लगबग सुरु झाली आहे.

(Image - open AI)
कधीपासून कधीपर्यंत करता येईल अर्ज-नोंदणी
या शैक्षणिक वर्षासाठी अकरावी प्रवेशासाठी नोंदणीप्रक्रिया आज म्हणजेच 21 मे पासून सुरु झाली आहे. विद्यार्थी आपली नोंदणी 28 मे 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत करु शकतील. यानंतर अर्ज नोंदणी प्रक्रिया बंद होईल. विद्यार्थी या वेळेत ऑनलाइन नोंदणी करू शकतात आणि अर्ज भरू शकतात, तसेच इच्छित कनिष्ठ महाविद्यालयांची यादी देखील देऊ शकतात.
अर्जासाठी वेबसाईट अन् महाविद्यालयाची निवड
प्राप्त माहितीनुसार, प्रत्येक अर्जदाराला पसंती यादीचा भाग म्हणून किमान एक कनिष्ठ महाविद्यालय आणि जास्तीत जास्त दहा महाविद्यालये निवडावी लागतील. विद्यार्थ्यांना mahafyjcadmissions.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करता येईल आणि इतर योग्य माहिती मिळणार आहे.
अकरावीसाठी किती काॅलेज किती जागा?
अकरावी प्रवेशासाठी यंदा महाराष्ट्रातील 9,281 कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयात एकूण 20,43,254 जागा आहेत. यामध्ये विज्ञान शाखेत 8,52,206 जागा, वाणिज्य शाखेत 5,40,312 जागा आणि कला शाखेत 6,50,682 जागा आहेत.
या तारखा लक्षात ठेवा..
- अकरावी प्रवेशासाठी नोंदणी वेळ: 21 मे ते 28 मे (सायंकाळी 6 वाजेपर्यंत)
- तात्पुरती गुणवत्ता यादी: 30 मे सकाळी 11 वाजता जाहीर होईल.
- तक्रार आणि दुरुस्ती वेळ: 30 मे ते 1 जून (सायंकाळी 4 वाजेपर्यंत)
- अंतिम गुणवत्ता यादी: 3 जून सायंकाळी 4 वाजता जाहीर होणार आहे.
- गुणवत्ता यादीनुसार प्रवेश वाटप: 5 जून
- वाटप झालेल्या महाविद्यालयांची यादी: 6 जून सकाळी 10 वाजता
- कागदपत्रे अपलोड : 6 जून ते 12 जून (सकाळी 11 ते सायंकाळी 6)
- दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा: 14 जून रात्री 10 वाजेपर्यंत
अकरावी प्रवेशासाठी अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम महाराष्ट्र इयत्ता 11 वी प्रवेश 2025 साठी अधिकृत वेबसाइट https://mahafyjcadmissions.in/ ला भेट द्या.
- होम स्क्रीनवरील नोंदणी लिंकवर क्लिक करा
- पसंतीचे महाविद्यालय निवडा
- सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि विनंती केलेली माहिती भरा
- अधिकृत पोर्टलवर गुणवत्ता यादी आणि महाविद्यालयीन वाटपाचा मागोवा घ्या.
समस्या आली तर काय करायचे?
जर तुम्हाला प्रवेश प्रक्रियेत काही अडचण आली, अथवा फाॅर्म अपलोड झाला नाही किंवा तांत्रिक समस्या आल्या तर त्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने 7669100257 किंवा 18003132164 या हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. हे क्रमांक सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहणार आहेत.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!








Click it and Unblock the Notifications