एकनाथ शिंदेंच्या शिलेदार मंत्र्यांना कोणती मिळाली खाती, वजनदार खात्यावर कोणाची लागली वर्णी, वाचा
Shiv Sena Portfolio Distribution : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. भाजपमधील 19, शिंदेंच्या शिवसेनेतील 11 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर आठ दिवसानंतर अखेर महायुतीचे खातेवाटप जाहीर झाले आहे.
त्यामध्ये, अखेर गृह मंत्रालय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच ठेवण्यात आले. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व गृहनिर्माण व सार्वजनिक बांधकाम विभाग ही खाते देण्यात आली आहे. तर शिंदेंच्या मंत्रिमंडळातील शिलेदारांना कोणती खाते देण्यात आली, याची यादी देखील जाहीर झाली. चला तर जाणून घेऊया, कोणाला कोणते खाते मिळाले आहे.

एकनाथ शिंदेंकडे कोणकोणत्या खात्यांची धुरा?
नगरविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग
शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना कोणत्या मंत्र्यांकडे कुठली खाती?
1.उदय सांमत - उद्योग व मराठी भाषा
2.प्रताप सरनाईक - वाहतूक
3.शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
4.भरत गोगावले - रोजगार हमी, फलोत्पादन, मीठ पान जमीन विकास
5.प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
6.दादा भूसे - शालेय शिक्षण
7.गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा
8.संजय राठोड - मृदा व जलसंधारण
9.संजय शिरसाट - सामाजिक न्याय
शिवसेनेचे राज्यमंत्री
10. योगश कदम - ग्रामविकास, पंचायत राज
11. आशिष जैस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय












Click it and Unblock the Notifications