Maharashtra Cabinet : राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा मोठे निर्णय, वित्त आयोगही स्थापन होणार, वाचा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी (दि.18 फेब्रुवारी) राज्य मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या हिताचे अतिशय महत्त्वाचे सहा निर्णय घेण्यात आले.
त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे अंमली पदार्थ टास्क फोर्ससाठी (ANTF) एकूण 346 नवीन पदे निर्माण करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यासाठी 22.37 कोटी रुपये इतका निधी खर्च केला जाणार आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाने सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यासही मान्यता दिली आहे.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतीली निर्णय (Maharashtra Cabinet meeting Decision)
▶ म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 1 हजार 594 कोटींची मान्यता. या योजनेतून अवर्षण प्रवण भागात 1 लाख 8 हजार 197 हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा
▶ अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता (ANTF) 346 नवीन पद निर्मिती व त्यासाठीच्या खर्चास मान्यता
▶ सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 18, 2025
👉 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)
✅म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर…
▶ राज्यातील रोपवेच्या कामांसाठी राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. (NHLML) ला आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास मान्यता
▶ जळगांव जिल्ह्यामधील चाळीसगांव तालुक्यातील वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या 1 हजार 275 कोटी 78 लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता. चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील 8 हजार 290 हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा
▶पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन देण्यास मंजूरी












Click it and Unblock the Notifications