Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अखेर ठरलं..! उद्या रविवारी नागपूरात होणार शपथविधी; पहा संभाव्य मंत्रिमंडळाची यादी

Maharashtra Cabinet expansion : महायुती सरकारचा शपथविधी होऊन दोन आठवडे उलटत आल्यानंतर अखेर मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त लागलं आहे. उद्या (15 डिसेंबर) रोजी रविवारी सायंकाळी चार वाजता नव्या मंत्र्याचा शपथविधी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

नवीन मंत्र्‍याचा शपथविधी उद्या नागपूर येथे होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे 21, शिवसेना शिंदे गटाचे 12 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 9 मंत्री उद्या शपथ घेणार आहेत.

maharashtra cabinet expansion

महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी होणार असून नागपूर राजभवनात शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात येत आहे. एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे जाईल, अशी चर्चा होती. परंतु आता रविवारी हा शपथविधी होणार असल्याची माहिती मिळत आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. मंत्रीपदासाठी निवडलेल्या नावांवर दिल्लीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

भाजपचे 21 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे.यामध्ये गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार,पंकजा मुंडे, नितेश राणे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, राहुल कुल, माधुरी मिसाळ, संजय कुटे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, गोपीचंद पडळकर हे मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

शिवसेनेचे 12 मंत्री शपथ घेण्याची शक्यता असून त्यामध्ये 9 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्री असणार आहेत. अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि संजय राठोड यांच्या नावाला भाजपचा विरोध असल्याची माहिती आहे. त्यामुळे या तिघांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेकडून उदय सामंत, शंभूराजे देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाठ, भरत गोगावले, आशिष जयस्वाल तर राज्यमंत्रीपदासाठी योगेश कदम आणि विजय शिवतारे हे राज्यमंत्री पदाची शपथ घेतील. याशिवाय प्रकाश आबिटकर किंवा राजेंद्र पाटील यड्रावकर यापैकी एकाच्या मंत्रीपदाची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादीकडूनही तयारी सुरु

अजित पवार गटाला 9 मंत्रिपदे देण्यात येणार आहेत. त्यात 7 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्रिपदे असणार आहेत. माजी मंत्री हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. तर त्याआधी माजी मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनीही अजित पवारांची भेट घेतली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांची सध्या लाँबिंग सुरु असून अजित पवार काही नव्या चेहऱ्यांनाही संधी देणार असल्याचे बोलले जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+