कोणता मंत्री महिलेला विवस्त्र फोटो पाठवतो?- वडेट्टीवारांनी सर्वच सांगितलं, म्हणाले- असले काळे धंदे!
Maharashtra Budget Session 2025 : "महायुती सरकार मधील एक एक मंत्र्यांचे प्रताप समोर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील एक मंत्री आहे, जो पैलवान आहे, त्याने एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवले, या प्रकरणी शिक्षा झाली तरी दहा हजार रुपये दंड भरून माफी मागतो आणि पुन्हा त्या महिलेच्या पाठी लागतो.. त्या महिलेला ब्लॅकमेल केले जाते. जर भाजप मंत्र्यांचे हे वर्तन असेल तर राज्यातील महिला सुरक्षित कश्या असतील?"
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधताना 5 जानेवारी 2025 रोजी विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महायुती सरकार मधील मंत्र्यांचे कारनामे वडेट्टीवार यांनी सांगितले.

माजी राष्ट्रपतीची जमीन बळकावली!
"महाराष्ट्रातील मंत्री त्यांनी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची 26 एकर जमीन बळकावली. मंत्रिमंडळातील मंत्री असे काळे धंदे करून फिरतात..या मंत्र्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, या मंत्र्यावर कारवाई केली पाहिजे." अशी मागणी काँग्रेस विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.
धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या - वडेट्टीवार
संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा मंत्री पदाचा राजीनामा झाला असला तरी त्याने प्रश्न सुटणार नाही. या प्रकरणी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. बीड इथे अनेक गुन्हे घडले आहेत, खंडणी, खुनाच्या घटना घडल्या आहेत. मुंडे यांना सहआरोपी केल्यावर अशा अनेक गुन्ह्यांचा उलगडा होईल. महाराष्ट्र आता बिहारच्या पुढे गेला का, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
पक्ष सोडण्याचा विचारही माझ्या मनात नाही
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना विजय वडेट्टीवार म्हणाले, मी पुरोगामी विचारधारेशी जोडलो आहे, काँग्रेसचा मी निष्ठावान शिपाई आहे, पक्ष सोडण्याचा विचारही माझ्या मनात येत नाही. सत्ता येवो न येवो मी माझ्या पक्षाचे काम करत आहे अस असताना जातीयवादी शक्ती सोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याबाबत कोणीतरी अफवा पसरवत असल्याचे काँग्रेस विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी स्पष्ट केले.












Click it and Unblock the Notifications