Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra Budget 2025: लाडक्या बहि‍णींना सरकारचा मोठा धक्का! काय मिळालं काय नाही? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Budget 2025 : लाडक्या बहि‍णींना देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्री लाडकू बहिण योजनेद्वारे अर्थसंकल्पात 1500 च्या मानधनात वाढ करुन 2100 रुपये हप्ता प्रतिमहिना देण्यासंदर्भात चर्चा झाली हेती, लाडक्या बहिणींनाही याची अपेक्षा होती परंतू आज यासंदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात भाषणात काहीही उल्लेख केलेला नाही.

महाराष्ट्रातील समस्त लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांची आज घोर निराशा झाल्याचे दिसून येत असून प्रथमदर्शनी माहितीनुसार, लाभाच्या हप्त्यात काहीही वाढ झाली नाही म्हणजे पुर्ववत जे दीड हजार रुपये मिळत होते तेच आता मिळत राहणार आहे, आज महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना काय मिळाले काय नाही? हे आपण जाणून घेणार आहोत. वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Budget 2025

लाडकी बहिण योजनेअंतर्गत 36 लाख कोटी रुपयांची तरतूद

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत 33 लाख 232 हजार कोटी खर्च झाला आहे असे अजित पवार यांनी सभागृहातील आपल्या भाषणादरम्यान सांगितले. आता पुढच्या वर्षांसाठी 36 लाख कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी करण्यात आली आहे. आगामी वर्षात 24 लाख महिलांना लखपती करणार असल्याचेही अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

अजित पवार म्हणाले...

  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील 2 कोटी 53 लाख महिलांना जुलै महिन्यापासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे.
  • त्यासाठी आतापर्यंत 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झाला आहे.
  • 2025-2026 या आर्थिक वर्षात या योजनेसाठी 36 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

महिलांना प्रोत्साहन देणार - अजित पवार

माझी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून महिलांना जो दीड हजार रुपयांचा लाभ मिळत आहे. त्यातून महिलांनी स्वंयरोजगार निर्मिती केली आहे. राज्यात अशी अनेक उदाहरणे आहेत. या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा वापर काही बचत गटांनी वीज भांडवलासाठी केला आहे, अशा महिलांना आणखी प्रोत्साहन देणार आहोत. यासाठी विशेष योजना राबवणार असल्याचे अजित पवार यांनी बजेटमधून स्पष्ट केले आहे.

मानधनात कधी वाढ होणार?

एकंदरीतच सध्या लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना जो दीड हजार रुपयांचे मानधन महिन्याला मिळते तेच मिळणार आहे. तूर्त त्यात कोणतीही रक्कम वाढ होईल अशी सध्या तरी आशा नाही. मानधनात वाढ होईल आणि दीड वरुन एकवीसशे रुपये मानधन मिळेल अशी राज्यातील कोट्यवधी महिलांची अपेक्षा होती पण तूर्त तरी ही फक्त अपेक्षाच राहणार असल्याचे दिसते. आता मानधनात कधी वाढ होणार याकडे महिलांचे लक्ष लागलेले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+