Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी; 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी थेट सांगूनच टाकलं

महायुती सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहिण योजनेचे कवित्व संपता संपत नाहीए. निवडणुकीवेळी महायुती सरकारने लाडक्या बहि‍णींना मिळणारे मानधन हे २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. आता महायुती सरकार सत्तेत आल्याने लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार, हा प्रश्न विचारला जात आहे. आज अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केला. मात्र त्यात लाडक्या बहि‍णींच्या मानधनात वाढ करण्याचे नियोजन नव्हते. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी देणार, याबबत थेट सांगून टाकले.

Ladki Bahin Yojana

लाडक्या बहि‍णींना आशा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या योजनेद्वारे महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे काही हफ्ते देण्यात आले आहेत. सरकारने विधानसभा निवडणुकीत या लाडक्या बहीण योजनेचे पैसे वाढवून २१०० रुपये दिले जातील, असे आश्वासन दिले होते. यानंतर महायुती सरकार बहुमताने निवडून आले. आता सरकारकडून २१०० कधी मिळणार, याकडे लाडक्या बहिणी नजरा ठेऊन आहेत. मात्र आजच्या अर्थसंकल्पात या लाडक्या बहि‍णींची निराशा झाली.

अर्थसंकल्पात निराशा

अर्थमंत्री अजित पवारांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. यामुळे लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये मिळणार की नाही, असा प्रश्न विचारला गेला.लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत. त्यातच आता या मुद्द्यावरुन विरोधकांनीही टीका करण्यास सुरुवात केली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना लाडकी बहीण योजनेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिले.

काय म्हणाले फडणवीस?

लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये मिळणार का, असा प्रश्न पत्रकारांनी फडणवीसांना विचारला. त्यावर ते म्हणाले, "यावेळी आम्ही आवश्यक तेवढी तरतूद केली आहे. 2100 देण्यावर आमचं काम सुरू आहे. योजना सुरू ठेवण्यासाठी आर्थिक शिस्त ठेवणे गरजेचं आहे. मागच्या ट्रेंडच्यानुसार पैसे देण्यात आले आहेत. वाटलं तर पैसे वाढवता येतील. ऑक्टोबर आहे, नोव्हेंबर आहे. आपण बॅलेन्स तयार करत, आपण आश्वासनं पूर्ण करु", असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. ते पुढे म्हणाले, "एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा 1500 रुपये मिळणार आहे. 2100 देण्यापूर्वी आम्ही घोषणा करु. काही लपून घोषणा करणार नाही, असं म्हणत महायुती सरकार २१०० रुपयांबाबत सकारात्मक असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+