Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

budget 2025 : महामानवांची 11 स्मारके आणि हजारो कोटींचा निधी; वाचा, अजित पवारांची मोठी घोषणा

अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, छत्रपती राजर्षि शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांचे स्मरण केले. या महामानवांचे स्मरण केल्यानंतर अजित पवारांनी विविध स्मारक बांधणार असल्याचा उल्लेख केला.

Maharashtra budget 2025

पर्यटनावर १ लाख कोटींची गुंतवणूक

निसर्गरम्य समुद्रकिनारा, प्राचीन लेण्या, गडकिल्ले, घनदाट वनसंपदा असा समृध्द वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे. पर्यटन क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीसाठी पर्यटन धोरण-2024 जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आता येत्या 10 वर्षात पर्यटन क्षेत्रात 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. राज्याचे आरोग्य पर्यटन धोरणही आखण्यात येत आहे, असे अजित पवार यांनी अर्थसंकल्पात सांगितले.

कोणकोणती स्मारके होणार

१. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला नजरकैदेत होते. उत्तर प्रदेश सरकारच्या सहकार्याने युपीत जागा उपलब्ध करुन घेऊन तेथे त्यांचे भव्य स्मारक उभारले जाईल. अशी घोषणा अजित पवारांनी केली.
२. याशिवाय शिवरायांच्या चरित्राची ओळख अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे करुन देण्यासाठी पुणे शहरातील आंबेगांव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यातील दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत कामासाठी राज्य शासनाकडून आणखी 50 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असेही अजित पवारांनी सांगितले.
३. कोकणातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकाची घोषणाही अजित पवारांनी केली.
४. छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र बलिदानस्थळ असलेल्या मौजे तुळापूर आणि समाधीस्थळ मौजे वढु बुद्रुक येथे त्यांच्या भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णयही अजित पवारांनी जाहीर केला.
५. स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून हरियाणातील पानिपत येथे यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. हरियाणा शासनाच्या मदतीने या स्मारकासाठी जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल, असे अजित पवारांनी सांगितले.
६. दादर येथील चैत्यभूमी येथे इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचे काम सुरु असून त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे अजित पवारांनी जाहीर केले.
७. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे अजित पवारांनी जाहिर केले.
८. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्‍प्यातील काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी राज्य शासनाकडून 220 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याची माहिती अजित पवारांनी दिली.
९. आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगांव येथे त्यांच्या कार्यास साजेसे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे.
१०. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ वाटेगांव येथील स्मारकासाठी तसेच त्यांच्या नांवे प्रस्तावित चिरागनगर, मुंबई येथील संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही अजित पवारांनी सांगितले.
११. संगमवाडी, पुणे येथील वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे काम प्रगतिपथावर आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+