राज्यात पाच दिवस पावसाचे! हवामानात मोठा बदल 'या' जिल्ह्यात कोसळणार जोरदार सरी अन् वादळी वारा वाहणार
Maharashtra Big change in weather : राज्यात पुढील चार ते पाच दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून विदर्भात काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवमान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात वाढलेला तापमानाचा पारा पुन्हा खाली येण्याची शक्यता आहे. सध्या बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे.

विदर्भात येलो अलर्ट, कसे राहील हवामान?
कोकण गोव्यात पुढील दोन दिवस बऱ्याच ठिकाणी,विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तिथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
मराठवाडा प. महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना येलो अलर्ट
पुढील चार ते पाच दिवस नांदेड, लातूर, धाराशिव व सोलापूर तर आज सांगली, परभणी, हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाट अन् सोसाट्याच्या वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील जिल्ह्यांना येलो अलर्ट पुणे वेधशाळेकडून देण्यात आलेला आहे.
पुणे आणि राज्यातील उर्वरित भागात कसे राहील हवामान
पुढील दोन दिवस राज्यातील उर्वरित जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुणे शहर व परिसरात पुढील काही दिवस आकाश सामान्य ढगाळ राहण्याची शक्यता असून अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुणे येथील प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मुंबई हवामान विभागाचे भाकित
दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस/गडगडाटी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण-गोव्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईत कसे राहील हवामान?
पुढील पाच सहा तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांत हलक्या पावसासह आकाश साधारणपणे ढगाळ राहील.कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२°C आणि २७°C च्या आसपास असेल.












Click it and Unblock the Notifications