राज्यातील 'या' 30 विधानसभा मतदारसंघात अटीतटीची निवडणूक! होतेय उमेदवारांची चर्चा!
Maharashtra Assembly Election Tight fight in 30 constituencies : राज्यात प्रचाराचा धुराळा थांबला असून आता 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीत आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, युगेंद्र पवार यांची मोठी चर्चा होत आहे, यासह दिग्गज उमेदवारांचीही चर्चा होत आहे. राज्यात असे 30 विधानसभा मतदारसंघात आहेत, जिथे अटीतटीची निवडणूक होत आहे. या निवडणुकीचे निकाल येत्या 23 नोव्हेंबरला लागणार आहे.
या निवडणुकीत बारामतीततून अजित पवार, वरळीतून आदित्य ठाकरे, कोपरी-पाचपाखाडीतून एकनाथ शिंदे आणि नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस लढत आहेत, या सर्वांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे. आज आपण ते 30 मतदारसंघ कोणते हे जाणून घेणार आहोत जिथे अटीतटीची निवडणूक होत आहे.

विधानसभा मतदारसंघ- पार्टी - कँडीडेट नेम (टाॅप 30)
1. जळगाव ग्रामीण
शिवसेना शिंदे ग्रूप - गुलाबराव पाटील
एनसीपी (एसपी) - गुलाबराव देवकर
2. जामनेर
भाजप- गिरीश महाजन
एनसीपी (एसपी) - दिलीप खोडपे
3. मुक्ताईनगर
शिवसेना (शिंदे ग्रूप) - चंद्रकांत पाटील
एनसीपी (एसपी) - रोहिणी खडसे
4. रिसोड
शिवसेना (शिंदे ग्रूप) - भावना गवळी
काँग्रेस - अमित झनक
5. बडनेरा
भाजप पुरस्कृत - रवी राणा
शिवसेना (युबीटी) - सुनील खराटे
6. अचलपूर
काँग्रेस - अनिरुद्ध देशमूख
प्रहार - बच्चू कडू
7. नागपूर दक्षिण पश्चिम
भाजप - देवेंद्र फडणवीस
काँग्रेस - प्रफुल गुडघे
8. कामठी
भाजप - चंद्रशेखर बावनकुळे
काँग्रेस - सुरेश भोयार
9. साकोली
भाजप - अविनाश ब्राम्हणकर
काँग्रेस - नानाभाऊ पटोले
10. अहेरी
एनसीपी - धर्मरावबाबा आत्राम
एनसीपी (एसपी) - भाग्यश्री आत्राम
11. ब्रम्हपुरी
भाजप - कृष्णलाल सहारे
काँग्रेस - विजय वडेट्टीवार
12. भोकर
भाजप - श्रीजया चव्हाण
काँग्रेस - तिरुपती कदम कोंडेकर
13. कळमनुरी
शिवसेना (शिंदे ग्रूप) संतोष बांगर
शिवसेना (युबीटी) - संतोष टारफे
14. सिल्लोड
शिवसेना (शिंदे ग्रूप) अब्दुल सत्तार
शिवसेना (युबीटी) सुरेश बनकर
15. कन्नड
शिवसेना (शिंदे ग्रुप) संजना जाधव
शिवसेना (युबीटी) उदयसिंह राजपूत
16 पैठण
शिवसेना (शिंदे ग्रुप) विलास संदीपान भुमरे
शिवसेना (युबीटी) दत्ता गोर्डे
17. येवला
एनसीपी - छगन भुजबळ
एनसीपी (एसपी)माणिकराव शिंदे
18. कोपरी पाचपाखडी
शिवसेना (शिंदे ग्रुप)एकनाथ शिंदे
शिवसेना (युबीटी) केदार दिघे
19. मुंब्रा-कळवा
एनसीपी - नजीब मुल्ला
एनसीपी (एसपी) जितेंद्र आव्हाड
20. मानखुर्द शिवाजीनगर
एनसीपी - नवाब मलिक
समाजवादी पार्टी - अबु आझमी
21. वांद्रे पुर्व
एनसीपी - झिशान सिद्दीकी
शिवसेना (युबीटी) - वरुण सरदेसाई
22. माहिम
शिवसेना (शिंदे ग्रुप) सदा सरवणकर
मनसे- अमित ठाकरे
शिवसेना (युबीटी) महेश सावंत
23. वरळी
शिवसेना (युबीटी) आदित्य ठाकरे
भाजप - मिलिंद देवरा
24. बारामती
एनसीपी - अजित पवार
एनसीपी (एसपी) युगेंद्र पवार
25. संगमनेर
शिवसेना (शिंदे ग्रुप) अमोल खताळ
काँग्रेस - बाळासाहेब थोरात
26. कर्जत-जामखेड
भाजप - राम शिंदे
एनसीपी (एसपी) रोहित पवार
26. परळी
एनसीपी - धनंजय मुंडे
एनसीपी (एसपी) राजेसाहेब देशमुख
27. कणकवली
भाजप - नितेश राणे
शिवसेना (युबीटी) संदेश पारकर
28. कुडाळ
शिवसेना (शिंदे ग्रुप) निलेश राणे
शिवसेना (युबीटी) वैभव नाईक
29. औरंगाबाद पूर्व
एमआयएम - इम्तियाज जलील
भाजप - अतूल सावे
30. बल्लारपूर
भाजप - सुधीर मुनगंटीवार
काँग्रेस - संतोषसिंह रावत












Click it and Unblock the Notifications