Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुख्यमंत्री शिंदेंचे विश्वासू शिलेदार शंभूराज देसाई विजयाची हॅटट्रिक करणार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना मुंबईत केली. मुंबईतला मराठी माणूस, त्याचा कोंडलेला आवाज, डावलले जाणारे त्याचे हक्क, नोकरीत न मिळणाऱ्या संधी यावर बाळासाहेबांनी आवाज उठवला आणि मुंबईच्या मराठी माणसाच्या मनात भक्कम स्थान निर्माण केले. संघटनेचा मुंबईत प्रचंड दबदबा असला तरी मुंबई जिंकण्यास शिवसेनेला बराच अवधी लागला. त्याआधी ठाणे शहरावर शिवसेनेने आपला झेंडा फडकवला होता.

मुंबई आणि ठाणे या परिसरात जम बसताच बाळासाहेबांनी आपले लक्ष मराठवाड्याकडे वळवले. मुंबई आणि ठाणे येथील नागरिकांचा कोकणशी बऱ्यापैकी संबंध असतो त्यामुळे कोकणात शिवसेना नैसर्गिकपणे वाढणे सहाजिक होते. आणि मराठवाड्यात विविध प्रश्नावर आंदोलने करून शिवसेनेने आपला जम बसवला. शिवसेनेला बस्तान बसवण्यासाठी सर्वात अवघड प्रदेश होता तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्र.

Shivsena Leader shambhuraj desai

काँग्रेसचा पारंपारिक पगडा, सहकार क्षेत्रावर असलेली पकड, साखर कारखाने, दूध संघ, जिल्हा बँका अशा महत्त्वाच्या ठिकाणी काँग्रेसचे मंडळी विराजमान होती.या संस्थांच्या माध्यमातून आर्थिक नाड्या हातात असल्यामुळे शिवसेनेच्या विस्ताराला प्रचंड मर्यादा होत्या. अपवाद वगळता पश्चिम महाराष्ट्रात शिरकाव करणे शिवसेनेसाठी खूप कठीण होते. अशा परिस्थितीत साताऱ्या सारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेला प्रवेश मिळवून दिला तो शंभूराज देसाई यांनी.

शंभूराज देसाई हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याच्या देसाई या नामांकित राजकीय कुटुंबातील व्यक्तिमत्व. त्यांचे आजोबा जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य आणि राज्यात मंत्रीही होते. पण देसाई आणि पाटणकर या वादात पाटण तालुक्यात पारडे कमी अधिक फरकाने दोघांच्याही बाजूने झुकायचे. 1995 साली राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले आणि 1997 च्या आसपास शिवसेनेने शंभूराजे देसाई यांना सहकार परिषदेचे अध्यक्ष करून संधी दिली. 1999 साली शंभूराजे देसाई शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवून पराभूत झाले. 2004 साली मात्र त्यांचा विजय झाला आणि शिवसेनेचा सातारा जिल्ह्यात खऱ्या अर्थाने प्रवेश झाला. 2004 साली निवडून आलेले शंभूराज 2009 साली पुन्हा पराभूत झाले मात्र 2014 आणि 19 अशा सलग दोन निवडणुकात त्यांनी बाजी मारली आणि मंत्री शंभूराज देसाई ही ओळख पाटण तालुक्यात निर्माण झाली.

डोंगरी तालुक्याचे नेतृत्व

पाटण तालुका हा सातारा जिल्ह्यातील डोंगरी तालुका आहे. कराड, सातारा अशा तालुक्यात जी समृद्धी आहे ती समृद्धी पाटण तालुक्याच्या वाट्याला फारशी आली नाही. त्यामुळे पाटण तालुक्यातील बहुसंख्य तरुण रोजगाराच्या शोधात मुंबई स्थिरावले. या मुंबईकर पाटणकरांची शंभूराज देसाई यांनी चांगलीच मोट बांधली आणि संघटन उभा केले.2022 साली महाराष्ट्रात जो उलटफेर झाला त्यात शंभूराजे देसाई यांनी एकनाथ शिंदे यांना सुरुवातीपासून साथ दिली. एकनाथ शिंदे यांचा शंभूराज देसाई यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. म्हणूनच शिंदे यांच्या पहिल्याच मंत्रिमंडळात शंभूराज देसाई यांना उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री म्हणून संधी देण्यात आली. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा जिल्हा. पण ठाण्याचे पालकमंत्री पद देखील एकनाथ शिंदे यांनी मोठ्या विश्वासाने शंभूराज देसाई यांच्याकडे सोपवले.

एकनाथ शिंदे यांची ढाल

सभागृहात आणि सभागृहा बाहेर देखील उद्धव ठाकरे गटाच्या तोफखान्याला तोंड देण्यात शंभूराज देसाई आघाडीवर असतात. खास सातारी भाषेत त्यांनी शिंदे यांच्यावर झालेल्या हल्ल्यांचा चांगलाच समाचार घेतला. ठाकरे नसताना दोन वर्ष शिवसेना चालवणे एकनाथ शिंदे यांच्यासारख्या दिलेर माणसालाच शक्य आहे अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

विकासासाठी सतत प्रयत्नशील

पाटण सारख्या डोंगरी तालुक्यात विकासाच्या मोठमोठ्या योजना राबवणे हे अवघड काम आहे. पण स्थानिक लोकांच्या हाताला रोजगार मिळावा, शेतीला पाणी मिळावे यासाठी शंभूराजे देसाई यांनी कसोशीने प्रयत्न केले. त्यातूनच तारळे 50 मीटर आणि शंभर मीटर जलसिंचन प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. तारळे सारख्या डोंगरी भागात या प्रकल्पामुळे मोठा फरक दिसणार असून वीस ते पंचवीस हजार नागरिकांना या योजनेचा मोठा लाभ होणार आहे . उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारण्याकरिता राज्य सरकारने तब्बल 94 कोटी रुपये मंजूर केले आहेत. याचा कोनशीला समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला .

पाटणसाठी 20 कोटींची पाणीपुरवठा योजना

पाटण शहर हे पाटण तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण आहे. या शहरात पाणीपुरवठ्यासाठी शंभूराजे देसाई यांच्या पाठपुराव्यातून वीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या माध्यमातून शहरातील सहा ते सात हजार पाटणवासीयांना पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. नटोशी जलसिंचन योजना आणि मोरणा भूमिगत पाईप लाईन साठी शंभूराजे देसाई यांच्या पाठपुराव्यातून 90 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. परिसरातील 20 ते 25 खेड्यातील पंधरा ते अठरा हजार नागरिकांना या योजनेचा लाभ होणार आहे.

पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी

पाटण हा डोंगरी तालुका आहे.कारखानदारीसाठी येथे पोषक अशी भूमी नाही. डोंगरी तालुक्यात उसाचे उत्पादन घेणेदेखील अवघड आहे. पाटण तालुक्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी पर्यटन हा एक महत्त्वाचा भाग आहे त्या दृष्टिकोनातून कोयना वॉटर टुरिझम प्रोजेक्ट अंतर्गत सरकारने 41 किलोमीटरचा कोयना ते पापर्डे बोट टुरिझम मार्ग मंजूर केला आहे. या माध्यमातून पाटण तालुक्यात पर्यटन क्षेत्राचा विकास होणार असून 75 हजार ते एक लाख रोजगाराच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संधी निर्माण होणार आहेत.

विजयाच्या हॅटट्रिकचा विश्वास

डोंगरी तालुक्याच्या नशिबी कायम मागास हा शिक्का बसलेला असतो. कर्तबगार लोकप्रतिनिधी आपल्या मेहनतीने आणि सरकार दरबारी असलेले वजन वापरून अशा तालुक्यांचे भाग्य बदलतात. शंभूराज देसाई यांनी त्या दृष्टीने प्रचंड प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्यासारखे गुणग्राही नेत्याने शंभूराजे देसाई यांच्यावर विश्वास ठेवला आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातून देखील शंभूराजे देसाई यांना 2024 साठी एकनाथ शिंदे यांनी पुन्हा संधी दिली आहे. विकास कामे आणि लोक संपर्काच्या जोरावर शंभूराज देसाई यावेळी विजयाची हॅटट्रिक करणार असा विश्वास शंभूराजे यांच्या समर्थकांना आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+