नॉट रिचेबल असलेले आमदार श्रीनिवास वनगा घरी आले, काही वेळाने पुन्हा घराबाहेर पडले
पालघर: मागील 36 तासापासून बेपत्ता असलेले शिवसेनेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचा त्यांच्या कुंटूबियाशी संपर्क झाला आहे. श्रीनिवास वनगा हे मध्यरात्री घरी त्यांच्या घरी आल्याची माहिती आहे. पहाटे तीनच्या दरम्यान वनगा हे घरी आले, त्यानंतर त्यांनी काही वेळ कुटूंबायांशी चर्चा केली.मात्र काही वेळाने वनगा हे घराच्या बाहेर पडल्याची माहिती आहे.
श्रीनिवास वनगा हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत.भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेले राजेंद्र गावित यांना यांना पालघरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे श्रीनिवास वनगा आणि त्यांचे कुटुंबीय मानसिक दृष्ट्या प्रचंड व्यथित झाले आहे. विद्यमान आमदार असतानाही श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी न मिळल्याने ते नाराज होते. सोमवारी संध्याकाळपासून आमदार वनगा हे बेपत्ता होते. मात्र अखेर 36 तासानंतर वनगा यांनी आपल्या कुटूंबाची भेट ते पुन्हा घराच्या बाहेर पडले आहेत.तब्येत ठीक नसल्याने ते आराम करण्यासाठी ते पुन्हा एकदा बाहेर पडले आहेत, अशी माहिती त्यांच्या कूटंबाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान वनगा यांच्या मनात आत्महत्याचे विचार घोळत असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले होते. त्यामुळे राज्यभर एकच खळबळ उडाली होती. वनगा यांचा शोध घेण्यासाठी पोलिस प्रशासन आणि कायकर्ते कामाला लागले होते. श्रीनिवास वनगा यांचे दोन्ही मोबाईल फोन सोमवारी संध्याकाळपासून बंद होते. त्यामुळे सर्व वनगा कुटुंबीय चिंतेत होते.
मंगळवारी पहाटेच्या सुमारास श्रीनिवास वनगा घरी आले होते. त्यानंतर त्यांनी पोलिसांची ही संपर्क साधल्याचे माहिती आहे. कुटूंबसोबत काहीवेळ बातचित केल्यानंतर ते पुन्हा एकदा घराबाहेर पडले असल्याची माहीती श्रीनिवास वनगा यांच्या पत्नीने दिली. मात्र वनगा पुन्हा कुठे गेले आहेत, याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.












Click it and Unblock the Notifications