Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस, महायुती-महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन तिढा कायम

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाचा गोंधळ अजून ही सुरुच आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. आज आणि उद्या मंगळवार पर्यंत उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. अश्यातच राज्यातील अश्या अनेक जागा आहेत, ज्याठिकाणी जागांचा तिढा अजून सुटलेला नाही.

माहीम मतदार संघातून शिंदेच्या शिवसेनेतून सदा सरणवकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र त्यांना निवडणूकीतून माघार घेण्याचा आग्रह करण्यात येत आहे. याबाबत रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवास्थानी सरवणकर यांची मनधरणी करण्यात आली असल्याची माहिती आहे.

mahavikas aghadi

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले असतानाही महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. महायुती आणि महाविकास आघाडीत तीन-तीन घटक पक्ष असल्यामुळे आता उमेदवारी कोणाला देयची यावरुन दोन्ही आघाड्यांची डोकेदुखी वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत मोठी बंडखोरी होण्याची शक्यता आहे. तसेच महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आहे..

जागा वाटपावरुन तिढा कायम

दरम्यान महाविकास आघाडीतील तिढा सोडवण्याकरिता शरद पवार यांच्या निवासस्थानी कॉंग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांच्या बैठक पार पडल्या आहेत. मात्र अजून जागा वाटप बाबत तिढा सुटलेला नाही. महाविकास आघाडीकडून आतापर्यंत मित्रांना पक्षांना किती जागा सोडल्या जाणार आहेत, याबाबत कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे स्पष्ट झालेलं नाही.

महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सोडविण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अनेक बैठक झाल्या आहेत. मात्र महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) या तीन पक्ष किती नेमक्या जागा लढणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मिळालेल्या माहीतीनुसार भाजप एकूण 150 जागा लढणार असल्याची शक्यता आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेला 80 जागा मिळणार असल्याची माहिती आहे.तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 50-55 जागा मिळणार असल्याची शक्यता आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+