Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुण्यानंतर आता जळगावात दोन ठिकाणी 'लक्ष्मी'दर्शन; रोकड किती, तर आकडा पाहून तुमचेही डोळे दिपतील

जळगाव : विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलिसांच्या नाकाबंदीत रोख घबाड सापडण्याचं सत्र सुरुच आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात रोकड सापडल्यानंतर आता जळगाव जिल्ह्यातील एरंडोल-पारोळा मतदार संघातील कासोदा गावात पुन्हा रोख रकमेचं घबाड सापडलंय.

पोलिसांच्या पथकाने नाकाबंदी दरम्यान मंगळवारी रात्री कारमधून दीड कोटींची रोकड जप्त केल्यामुळे एकच खळबळ उडाली. विधानसभेचा बिगुल वाजला असून पोलीस प्रशासनातर्फे नाकाबंदी करण्यात आली आहे. या नाकाबंदीत पोलिसांनी ही रोकड हस्तगत केली.

jalgaon erandol

रोकड सापडली खरी, पण आहे कुणाची?

कासोदा गावातील फरकांडे चौफुलीवर पोलिसांचे पथक सायंकाळी सहाच्या सुमारास नाकाबंदीसाठी थांबले होते. एका क्रेटा कारची तपासणी केल्यावर त्यात रोकड सापडली. पोलिसांना तब्बल एक कोटी 45 लाखांची रोकड हस्तगत केली. त्यानंतर तत्काळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत ही रोकड नेमकी कोणाची आणि कशासाठी आणली होती? याचा तपास लागला नाही. परंतु या कारमधील रोकड एका बड्या राजकीय नेत्याशी संबंधित असल्याचीही जोरदार चर्चा आहे.

दुसऱ्या घटनेतही सापडली रोकड

कासोदा गावानंतर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील चोपडाई तपासणी नाक्यावर पोलिसांच्या तपासणीत अजून एका वाहनात रोकड सापडली. त्या वाहनातून 16 लाख 38 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून तपासणी करत कारवाई करण्यात येत आहे.

पथकाने ही रक्कम उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासमक्ष पंचनामा करून जप्त केली. रक्कम 10 लाखाच्या वर असल्याने ती आयकर विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. ज्या वाहनात रक्कम आढळली ते वाहन चोपडा येथील असून रक्कम ही एका व्यापाऱ्याच्या कापसाची रक्कम असल्यास सांगण्यात येत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+