महाराष्ट्रातील वृद्ध मतदारांसाठी निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, घरातूनही करता येणार मतदान
मुुंबई : निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, निवडणूक आय़ोगाने वृद्ध मतदारांसाठी मोठी घोषणा केली. त्यांना घरात बसून देखील मतदान करता येणार आहे. तर वृद्धांसाठी मतदान केंद्रावर अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत.
महाराष्ट्रातील निवडणुकीची प्रक्रिया अशी असेल...!
23 ते 29 ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार
30 ऑक्टोबर उमेदवार अर्जाची छाननी
4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेता येणार
20 नोव्हेंबरला राज्यात मतदान
23 नोव्हेंबरला मतमोजणी

Election Commission of India to announce the schedule for General Election to Legislative Assemblies of Maharashtra and Jharkhand 2024.
— ANI (@ANI) October 15, 2024
ECI to hold a press conference at 3:30 PM today. pic.twitter.com/yehIR0qUsm
मागील काही दिवसांपासून महायुती सरकारने कॅबिनेटमध्ये धडाकेबाज निर्णय़ घेतले आहेत. राज्यात कोणत्याही क्षणी निवडणूकीची घोषणा होईल म्हणून सरकारने मंत्रीमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटपाच्या बैठका सुरुच आहेत. दोन्ही आघाड्याकडून सांगण्यात येत आहे की, जागा वाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. महायुतीच्या जागा वाटपासाठी आज महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच महायुतीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्याता आहे.
राज्यपाल नियुक्त आमदारचा आज शपथविधी
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नावे महायुतीकडून पाठवल्याची माहिती आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत भाजपाकडून 3, शिवसेना शिंदे गट 2 आणि अजित पवार गटाकडून 2 नावं पाठवल्याची माहिती आहे. महाराष्ट्र विधान परिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्य आज दुपारी 12 वाजता उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचेकडून सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत .विधान भवन मुंबई येथील मध्यवर्ती सभागृह येथे हा शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे.
आज राज्यपाल नियुक्त शपथ घेणा-या सदस्यांची नावे -
1) चित्रा किशोर वाघ
2) विक्रांत पाटील
3) धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड
4) पंकज छगन भुजबळ
5) इद्रिस इलियास नाईकवाडी
6) हेमंत श्रीराम पाटील
7) डॉ श्रीमती मनीषा कायंदे.
महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा
महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. महायुतीत प्रमुख पक्ष भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आहे. हे तिन्ही पक्ष महायुती मिळून निवडणूक लढवत आहे.या सोबतच त्यांच्या काही छोटे घटक पक्ष सुध्दा असणार आहेत. महाविकास आघाडीत ही शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस हे तीन पक्षासह काही घटक पक्षांना सोबत घेऊन एकत्र निवडणुका लढवणार आहेत.
महाराष्ट्रात 2019 साली विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यावेळी भाजप आणि शिवसेना यांनी युती म्हणून निवडणूकीला सामोरे गेले होते. त्यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने युतीला बहुमत दिले होते. पण शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद झाला आणि त्यानंतर दोन्ही पक्ष वेगळे झाले.
सरकार स्थापन करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्री झाले. मात्र 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंना सोडचिठ्ठी देत 40 आमदारांसह भाजपशी हातमिळवणी केली. सध्या ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. 2023 मध्ये शरद पवारांना विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही फुट पडली.अजित पवार यांनी आमदारांचा एक गट घेऊन भाजप आणि शिंदे यांच्यासोबत महायुतीत सहभागी झाले.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक









Click it and Unblock the Notifications