Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जेलमध्ये असलेले BJP आमदार गणपत गायकवाडांचे तिकीट कापले, बंड नको म्हणून भाजपकडून डाव!

पोलिस ठाण्यात जाऊन शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळ्या झाडणारे भाजप आमदार गणपत गायकवाड हे सद्या जेलमध्ये आहेत. तर भाजपने आज जाहीर केलेल्या यादीमध्ये गणपत गायकवाड यांचे तिकीट कापले आहे. परंतु, दुसरीकडे भाजपने गायकवाड यांचे बंड नको व्हायला म्हणून डाव खेळला. गणपत गायकवाड यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देऊन संधी दिली आहे. परंतु, सुलभा गायकवाड यांना ही निवडणूक म्हणावी तितकी सोपी राहणार नाही.

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यामुळे राज्यात सद्या जागावाटपासंदर्भात महायुती व महाविकास आघाडी यांच्यात बैठका सुरू आहेत, अशातच भाजपने त्यांची पहिली यादी जाहीर केली. यात 99 उमेदवारांचा समावेश आहे. तर यात 13 महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

Maharashtra Assembly Election 2024

पोलिस ठाण्यातच घातल्या होत्या शिंदेंच्या नेत्यावर गोळ्या

दुसरीकडे महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून ज्या मतदारसंघांची चर्चा होती. त्यापैकी कल्याण मतदारसंघाची जास्त चर्चा झाली. त्यामागील कारण होते. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड घडली होती. कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात घुसून शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यावेळी महेश गायकवाड यांचे सहकारी राहुल पाटील यांना देखील गोळ्या लागल्या होत्या. या गोळीबाराची चर्चा राज्यभरात झाली. विरोधकांनी तर सत्तेचा माज अशा शब्दात टीका केली. यात महत्त्वाची बाब म्हणजे सुदैवाने महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे वाचले.

अखेर भाजपने खेळी रचली, बंड शमवले, पण...

या घटनेनंतर गणपत गायकवाड यांना अटक झाली. यात पोलिसांना पुरावे दिसून आल्याने अजूनही गणपत गायकवाड हे तेव्हापासून जेलमध्येच आहेत. गणपत गायकवाड यांना हे गोळीबार प्रकरण प्रचंड भोवलं आहे. त्यांच्या कृतीमुळे गणपत गायकवाड यांचं विधानसभेचं तिकीट देखील कापण्यात आले. परंतु, भाजपने त्यांना तिकीट न दिल्याने मोठी खेळी केली. भाजपने गायकवाड यांना दिलासा दिला आहे. कारण भाजपकडून गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली.

सुलभा गायकवाड यांचे कार्य काय?

सुलभा गायकवाड या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. गणपत गायकवाड यांना अटक केल्यानंतर सुलभा गायकवाड यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सुलभा गायकवाड या प्रत्येक समजासाठी काम करत आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी सुलभा गायकवाड यांच्या नेतृत्वात कल्याणपूर्वीत भाजपने महायुतीच्या उमेदवारासाठी काम केलं. सुलभा गायकवाड यांच्याकडून प्रचार देखील सुरु झाला आहे. पण, दुसरीकडे शिंदे गटाच्या नेत्यांकडून या ठिकाणी काम होणार की नाही, याचा प्रश्न आहे. कारण, या ठिकाणी गायकवाड व स्थानिक शिवसेना नेत्यांचा वाद कायम असतो. त्यामुळे येत्या काळातच या ठिकाणी बंड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मुंबईतील विधानसभा उमेदवारांची यादी

मुलुंड - मिहिर कोटेचा
कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर
चारकोप - योगेश सागर
मालाड पश्चिम - विनोद शेलार
गोरेगाव - विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम - अमित साटम
विलेपार्ले - पराग अळवणी
घाटकोपर पश्चिम - राम कदम
वांद्रे पश्चिम - आशिष शेलार
सायन कोलीवाडा- कॅप्टन तमिल सेल्वन
वडाळा - कालिदास कोळंबकर
मलबार हिल - मंगलप्रभात लोढा
कुलाबा - राहुल नार्वेकर


भाजपने पुन्हा विश्वास दाखवला..

भाजपकडून विधानसभा निवडणुकीत अँटी इन्कन्म्बसी फॅक्टरचा प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी मुंबईत भाकरी फिरवून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. मात्र, उमेदवारी यादीवर नजर टाकल्यास भाजपने जुन्या आमदारांवर पुन्हा विश्वास दाखवल्याचे दिसत आहे.

अयोध्या यात्रेचा झाला लाभ?

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या मिहीर कोटेचा यांना मुलुंडमधून रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर राम कदम यांना घाटकोपर पश्चिम आणि तमिल सेल्वन यांना धारावीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या दोघांचे तिकीट खराब कामगिरीमुळे कापले जाईल, अशी चर्चा होती.

मात्र, राम कदम यांनी गेल्या काही वर्षांमध्ये काशी यात्रा, अयोध्या यात्रांचा जो सपाटा लावला होता, त्याचा त्यांना जनसंपर्काच्यादृष्टीने फायदा झाला आणि त्यांना पुन्हा एकदा भाजपकडून उमेदवारी मिळाली असावी, असा अंदाज बांधला जात आहे. याशिवाय, आशिष शेलार (वांद्रे पश्चिम ) आणि त्यांचे बंधू विनोद शेलार (मालाड पश्चिम) या दोन्ही बंधूंना भाजपने उमेदवारी दिली आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+