विधानसभा निवडणुकीसाठी एकूण किती मतदार? महिला, पुरुष, तृतीयपंथी किती, शंभरी ओलंडलेले इतके मतदार, वाचा
Maharashtra assembly elections Announcement : केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार असून महाराष्ट्रातील निवडणुकींची घोषणा केली जाणार आहे. निवडणुकीची घोषणा होताच आचारसंहीता लागू होणार असून निवडणुकीच्या तारखाही कळणार आहेत. तर दुसरीकडे निवडणुकीसाठी राजकीय पक्षांन जय्यत तयारी केली आहे. सत्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील दोन्ही आघाड्या मतदारांचे लांगुलचालन करत आहेत.
आज आपण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी एकूण मतदार किती आहेत, यामध्ये महिला, पुरुष, तृतीयपंथी किती, शंभरी ओलंडलेले किती मतदार आहेत हे जाणून घेणार आहोत.

ही निवडणूक का वेगळी...?
- महाराष्ट्रात यंदा शिवसेना फुटलेली आहे.
- दोन शिवसेना विधानसभेला आमने सामने येणार आहेत.
- राष्ट्रवादी काँग्रेसही यंदा फुटलेली आहे.
- दोन राष्ट्रवादी यंदा एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकणार आहेत.
- काँग्रेस, शिवसेना युबीटी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहे.
- भाजप राष्ट्रवादी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना पहिल्यांदाच सोबत लढत आहे.
- भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात मोठा संघर्ष आहे.
- गाजलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि मनोज जरांगे यांची एंट्री
- भाजप शिवसेना युबीटी युती नाही.
महाराष्ट्रात एकूण 9 कोटी 59 लाख मतदार, 288 संघ
1. एकूण मतदार - 9 कोटी 59 लाख
2. पुरुष मतदार - 4 कोटी 59 लाख
3. महिला मतदार - 4 कोटी 64 लाख
4. तृतीयपंथी मतदार - 56 हजारांवर
5. दिव्यांग मतदार - 6 लाख 32 हजार
6. 85 वर्षांवरील मतदार - 12 लाख 48 हजार
7. शंभरी ओलांडलेले मतदार - 49 हजारांहून जास्त
8. नवमतदार - 19 लाख 48 हजार












Click it and Unblock the Notifications