ठरलं एकदाचं..! 'या' दिवशी होणार निवडणुकांची घोषणा, 'या' तारखेपासून आचारसंहितेची शक्यता
Maharashtra Assembly Election 2024 : हरियाणा आणि जम्मू-काश्मिरच्या निवडणुका झाल्या. या निवडणुका ज्यावेळी जाहिर झाल्या त्यावेळीच महाराष्ट्राच्या निवडणुका जाहिर होतील, अशी शक्यता होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका कधी होणार, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या निवडणुकांबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असल्याची समजते. निवडणूक आयोग निवडणुकांच्या, आचारसंहितेच्या तारखा कधी जाहीर करणार, याची उत्सुकता राजकीय पक्षांप्रमाणेच मतदारांनाही लागली आहे. महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा 13 ऑक्टोबरनंतर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ऑक्टोबरच्या मध्यावर लागणार आचारसंहिता?
हरियाणा व जम्मू काश्मीर निवडणुकांचे निकाल 8 ऑक्टोबरला लागण्याची शक्यता आहे. म्हणजेच हरियाणा- जम्मू काश्मीर निवडणूक कार्यक्रम 10 ऑक्टोबरला संपणार आहे. नियमानुसार एक निवडणूक कार्यक्रम संपण्यापूर्वी दुसऱ्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करता येत नसते. 10 ऑक्टोबरला या दोन्ही मोठ्या राज्यांच्या निवडणुका संपल्यावर निवडणुक आयोगाला पुढच्या कार्यक्रमासाठी वेळ द्यावा लागतो. 13 ऑक्टोबरला रविवार आहे. त्यामुळे साधारणः 14 तारखेनंतर महाराष्ट्रात आचारसंहितेची घोषणा होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ऑक्टोबरच्या मध्यावर किंवा चौथ्या आठवड्यापूर्वी आचारसंहिता लागण्याची शक्यता वाढली आहे.
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नवी विधानसभा
निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर साधारण 45 दिवसांनी नवीन विधानसभेची स्थापना होणे अपेक्षित असते. त्यामुळे निवडणूक आयोगाने नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक घ्यायचे ठरवले, तर त्यासाठी साधारण ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. तेव्हापासून राज्यात लगेच आदर्श आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर 45 दिवसांचा कालावधी गृहित धरला तरी 26 नोव्हेंबरपूर्वी नव्या विधानसभेची स्थापना होणे शक्य आहे. डिसेंबरमध्ये विधानसभेत नवीन सदस्य दिसतील, अशी शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात हालचालींना आला वेग
लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला. त्याऊलट महाविकास आघाडीने अभूतपुर्व यश मिळवले. मविआ मागील निवडणुकीमुळे हवेत आहे. विधानसभेतही हा टेम्पो कायम ठेवण्याचा मविआचा प्रयत्न आहे. लवकरच या दोन्हींचे जागावाटपही पूर्ण होईल. त्यासाठी मॅरेथाँन बैठका सुरु आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारी पातळीवरही कारभार वेगाने सुरू आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नव्या प्रस्ताव आणि फाईल्सच्या मंजुरीचा वेग कैकपटीने वाढला आहे. मंत्रीमंडळ बैठकीत तर शासन निर्णय काढण्याचा धडाका सुरू आहे.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
Bihar next cm : ठरलं! 'हा' नेता होणार बिहारचा नवा मुख्यमंत्री! नितीश कुमार दिल्लीला जाणार.. -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
Kuldeep yadav wedding date : कुलदीप यादव बोहल्यावर चढणार! कोण आहे होणारी पत्नी वंशिका? जाणून घ्या -
'धुरंधर-2' चा राडा! पहिल्याच दिवशी 'एवढी' कमाई; 'रणवीर'च्या चित्रपटाचे रेकॉर्डब्रेक ॲडव्हान्स बुकींग -
पुरुषांनो, 'या' 5 सामान्य लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; असू शकतो वाढलेल्या प्रोस्टेटचा धोका!










Click it and Unblock the Notifications