पुन्हा पक्ष फोडण्याची भाषा! प्रश्नावर ठाकरे म्हणाले- दसरा मेळाव्यात फडशा पाडणार! शिवसेनेचं गीत रिलिज
Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray On Amit Shah :"सध्या जे अराजक माजले आहे त्यासाठीच आम्ही राजकीय गाणं काढलं असून ते राजकीय अराजक नष्ट करेल. अमित शहा येतात आणि पक्ष फोडण्याची भाषा करत आहेत, त्या सर्व गोष्टींचा फडशा मी शिवाजी पार्कवर पाडणार आहे. असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात दंड थोपटले आहेत. आता ज्यांना बोलायचे त्यांनी बोला, टीका करा मी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यात सर्वाचा समाचार घेतो असा इशाराही त्यांनी दिला.
आज मातोश्रीवर शिवसेनेचे गोंधळ गीत रिलिज झाले असून याची अधिकृत घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. त्यावेळी ते बोल होते. यावेळी संजय राऊत यांच्यासह नंदेश उमप, गीताचे गीतकारासह पक्षाचे इतर नेते उपस्थित होते. दार उघड बये..दार उघड बये असे गीताचे बोल असून ते नंदेश उमप यांनी गायलेले आहे. अशी माहितीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. असुरांचा संहार कराया मशाल हाती दे सत्वर भुवर ये ग अंबे सत्वर भुवर ये..असे या गीताचे बोल आहे.

आई जगदंबा आमच्या मदतीला येईल
उद्धव ठाकरे म्हणाले, गेले दोन अडीच वर्ष आम्ही न्याय मंदिराचे दार ठोठावत आहोत. हात दुखायला लागले. न्यायदेवतेवर विश्वास आहे पण न्याय लवकर मिळत नाही. त्यामुळे आम्ही देवीकडं मागणं मागितलं आहे. मला आत्मविश्वास आहे की, ही सगळी तोतयेगिरी जी चालली आहे, सरकार जे भ्रष्टाचार करत आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत. कुणी त्राता दिसत नाही. मला नक्की खात्री आहे की, आई जगदंबेला हाक मारल्यानंतर ती भक्तांच्या रक्षणासाठी धावून येते हे वेळोवेळी इतिहासात येते, याही वेळी ती येणार.
आम्ही जनतेच्या दरबारात आलोय..
उद्धव ठाकरे म्हणाले, हे गाणे आपल्यामाध्यमातून महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात पसरवावे असे आवाहन केले. नवरात्र उत्सवाच्या एकदा शुभेच्छा देतो असे म्हणत आता जनतेच्या दरबारात शिवसेना कुणाची ही लढाई पुन्हा सुरु झाली असंही ठाकरे यांनी म्हटले आहे.
शिवाजी पार्कवर सत्ताधाऱ्यांना देणार उत्तर
उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या जे अराजक माजले आहे त्यासाठीच आम्ही राजकीय गाणं काढलं असून ते राजकीय अराजक नष्ट करेल. अमित शहा येतात आणि पक्ष फोडण्याची भाषा करत आहेत या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी आपलं मत व्यक्त केलं. त्या सर्व गोष्टींचा फडशा मी शिवाजी पार्कवर पाडणार आहे. असं उत्तर त्यांनी दिलं. सणासुदीचे दिवस आहे म्हणून या गाण्याच्या निमित्तानं आपण एकत्र आलो त्यामुळे आम्ही राजकारणावर आता यावेळी बोलणार नाही.
ज्यांना टीका करायची त्यांनी करा
उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्यावर ज्यांना टीका करायची त्यांना ती करुन घेऊद्या. मी दसऱ्याच्या दिवशी यावर बोलणार आहे. आम्ही जगदंबेला बये दार उघड असे आवाहन आम्ही करत आहोत. देवी आमचं गाऱ्हाणं ऐकेल.












Click it and Unblock the Notifications