प्रकाश सुर्वे तिसऱ्या विजयासाठी सज्ज, पश्चिम उपनगरात महायुतीची स्थिती मजबूत
Maharashtra Assembly Election 2024 : जवळपास 58 वर्षांच्या राजकीय वाटचालीत शिवसेना या संघटनेच्या प्रवासात अनेक नेते सहभागी झाले. काही ठिकाणी शिवसैनिकांनी मेहनत घेऊन नेतेपदे मिळवली तर काही ठिकाणी शिवसेनेचा विचारधारेने आकृष्ट झालेले अन्य पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेते झाले. शिवसेनेच्या या राजकीय प्रवाहात आणि प्रवासात सहभागी झालेले असे एक नाव म्हणजे मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे हे होय.
मुंबई पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली,कांदिवली,दहिसरपर्यंत पसरलेली आहे. मुंबई शहरानंतर मुंबई उपनगर आणि परिसराने शिवसेनेला चांगला हात दिला. बोरीवली, कांदिवली, दहिसर या परिसरात भाजपचे वर्चस्व असले तरी शिवसेनेची संघटनाही तिथे बऱ्यापैकी रुजली.अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचेही तिथे अस्तित्व आहेच. 2014 पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत असलेले प्रकाश सुर्वे 2014 सालीच शिवसेनेत दाखल झाले आणि त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा मागाठाणे विधानसभा मतदारसंघात पराभव केला आणि ते पहिल्यांदा आमदार झाले.2019 साली शिवसेना भाजपा युती झाली आणि प्रकाश सुर्वे हे मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून युतीचे उमेदवार होते. सलग दुसऱ्या वेळी त्यांनी त्या मतदारसंघातून विजय संपादन केला.

2019 मध्ये राज्यात अनेक भूकंप
2019 हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात असंख्य बदल घडवणारे वर्ष होते. यावर्षीच महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुतीला कौल दिला. भाजपच्या 105 तर शिवसेनेच्या 56 जागा निवडून आल्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे जवळपास स्पष्ट होते. पण निकालांच्या दिवशीच शिवसेनेने उलटी भूमिका घेतली आणि आपल्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. बोल बोल म्हणता शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी जन्माला आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री झाले आणि जनतेने कौल दिलेल्या भारतीय जनता पक्षाला विरोधी बाकावर बसावे लागले .गंमत म्हणजे जनतेने नाकारलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही आघाडी आडवाटेने सत्तेत येऊन बसली होती.
संघर्षाचा काळ
2019 नंतरचा काळ हा महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा सर्वात कठीण काळ म्हणून ओळखला जातो. विशेषतः शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचा प्रचंड संघर्ष झाला.भाजपचे नेते शिवसेनेवर अक्षरशः तुटून पडले. या संघर्षात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, तत्कालीन मंत्री नबाब मलिक,संजय राऊत अशा आघाडीच्या नेत्यांना कारावास भोगावा लागला. अखेरीस 2022 साली एकनाथ शिंदे यांनी बंड केले. भाजपने एकनाथ शिंदे यांच्या बंडाला रसद पुरवली. उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले. आणि शिवसेनेत बंडाचा झेंडा हाती घेतलेले एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. 2019 साली जनतेने मुख्यमंत्री म्हणून त्यांना सर्वाधिक पसंती दिली होती ती देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलेल्या शिवसेनेच्या आमदारांत एक मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे हे एक महत्त्वाचे नाव होते.
देविपाडा झोपडपट्टीवासियांचा प्रश्न सोडवला
प्रकाश सुर्वे हे राष्ट्रवादीतून आलेले असले तरी त्यांचा पिंड शिवसैनिकासारखाच आहे. आक्रमकपणे काम करणारा नेता म्हणून त्यांची पश्चिम उपनगरात ओळख आहे. मतदारसंघातील जनतेच्या कामासाठी धावून जाण्याच्या त्यांच्या स्वभावामुळेच त्यांना दोन वेळा येथील जनतेने पसंती दिली. त्यांच्या मतदारसंघातील देवीपाडा ही झोपडपट्टी पुनर्विकासासाठी घेण्यात आली होती. झोपडपट्टीतील रहिवाशांना घरे देण्याचे आश्वासन झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या अंतर्गत देण्यात आले होते. मात्र या पुनर्विकासाला प्रचंड विलंब झाला आणि तीन वर्षांपासून विकासकाने रहिवाशांचे भाडे थकवले. प्रकाश सुर्वे यांनी या विषयात पुढाकार घेऊन रहिवाशांचे थकीत भाडे अदा करण्यास विकासकाला भाग पाडले. यासाठी संबंधित यंत्रणांची त्यांनी अनेक बैठका घेतल्या. आणि येथील रहिवाशांचा प्रश्न सोडवला.
आकुर्ली पुलासाठी पुढाकार
आकुर्ली येथे उभारण्यात आलेला अंडरपास उत्तर मुंबईतील महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्पापैकी एक आहे. या प्रकल्पाने कांदिवली पूर्व आणि मागठाणे येथील आमदारांच्या कार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब केले आहे. पश्चिम उपनगरातील पश्चिम द्रुतगती महामार्गावर आकुर्ली पुलाची उभारणी करण्यात आली आहे. यासाठीही प्रकाश सुर्वे यांनी पुढाकार घेतला. या पुलामुळे येथे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागला आहे. पुष्पा पार्क आणि कांदिवली येथील रहिवाशांना यामुळे दिलासा मिळाला आहे. पश्चिम उपनगरातील हनुमान नगर, केतकी पाडा, समता नगर, कोकणी पाडा या मागठाणे विधानसभा मतदारसंघातील विविध भागात सांडपाणी आणि मलनिस्सारणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रकाश सुर्वे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
मतदारसंघात महायुतीची स्थिती मजबूत
प्रकाश सुर्वे हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती मानले जातात. त्यांच्या वतीने मागाठाणे परिसरात मोठा दहीहंडी उत्सव घेण्यात येतो. मतदार संघातील विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमात प्रकाश सुर्वे यांचा सहभाग असतो. सामान्य माणसात उतरून काम करणारा माणूस अशी प्रकाश सुर्वे यांची ख्याती आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून पुन्हा प्रकाश सुर्वे यांनाच उमेदवारी दिली आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पियुष गोयल विक्रमी मताधिक्याने निवडून आले आहेत. या सर्वांचा लाभ प्रकाश सुर्वे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत होईल असा पश्चिम उपनगरातील राजकीय पंडितांचा अंदाज आहे.
-
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Rajya Sabha Election 2026 Result : राज्यसभेच्या 37 जागांचा निकाल; पाहा विजेत्यांची यादी -
अदानी टोटल गॅसकडून औद्योगिक ग्राहकांसाठी अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या दरात कपात -
Gold silver price today : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा ताजे दर -
Health News : जोडीदाराला किस करणं पडू शकतं महागात! वेळीच सावध व्हा, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
केरळमध्ये पुन्हा 'लाल वादळ' की काँग्रेसची सरशी? ओपिनियन पोलचे आकडे समोर; पाहा कोणाला मिळणार सत्ता! -
Oscars 2026 Winners : ऑस्कर पुरस्कारांची घोषणा हा चित्रपट ठरला सर्वात भारी; पाहा संपूर्ण विनर लिस्ट -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य







Click it and Unblock the Notifications