Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

"कोणत्याही स्थितीत BJP ला हरवायचे" MVA टाकणार 'हा' डाव, जागावाटपाबाबत संजय राऊतांचे मोठे वक्तव्य!

Maharashtra Assembly Election 2024 : "कोणत्याही परिस्थितीत भाजपला हरवायचेय आहे. आम्ही प्रत्येक मतदारसंघानिहाय चर्चा करत आहोत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजपला हरवायचे आहे. असं म्हणत शिवसेना युबीटी नेते तथा खासदार संजय राऊत यांनी जागावाटपाबाबत राऊतांचे मोठे विधान केले आहे.

मुंबईत महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांची बैठक सुरु असून या बैठकीत जागावाटपावर चर्चा होत आहे. याअनुशंगाने आज सायंकाळी संजय राऊत यांनी माध्यमांशी वार्तालाप केला आणि आज बैठकीत काय झाले यासंदर्भात माहिती दिली.

Maharashtra Assembly Election 2024

दोन्ही डाव्या पक्षांना सोबत घेणार

संजय राऊत म्हणाले, दोन्ही डाव्या पक्षांचे नेते आज आले. हे सर्व पक्ष लोकसभेत आमच्यासोबत होते. त्यामुळे आम्ही काय करणार यावर चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने आमच्या आघाडीतील घटक पक्षांची चर्चा सुरु आहे. आज दोन्ही डाव्या पक्षांचे नेते चर्चेसाठी आले आहेत. सर्व पक्ष आमच्यासोबत राहावेत हा आमचा प्रयत्न आहे. विधानसभेला आम्ही त्यांना आमच्यासोबत घेतले तर त्यांना काय देऊ शकू यावर आज चर्चा झाली आहे.

अजून दोन तीन दिवस चर्चा सुरु राहणार..

संजय राऊत म्हणाले, आज या चर्चेचा चौथा दिवस आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने सकारात्मकपणे चर्चा पुढे जात आहे. आज शिवसेनेच्या पक्षकार्यालयात काँग्रेस नेते नाना पटोले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील, आमच्या पक्षाचे सर्व नेते आम्ही एकत्र बसून चर्चा करत आहोत. अजून दोन तीन दिवस चर्चा होत राहील.

कोणत्या परिस्थितीत भाजपला हरवायचेय..

संजय राऊत म्हणाले, प्रत्येक सीटवर चर्चा होत आहे. प्रत्येक सीटवर आम्हाला भाजपला हरवायचे आहे. आम्ही त्या अनुशंगाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचाय आढावा घेत आहोत. संजय राऊत यांचे हे वक्तव्य आणि प्रत्यक्ष मविआची कृती म्हणजे मविआ मजबूत संघटन बनवण्याच्या दिशेने हे पाऊल असून भाजपला नेस्तनाबूत करण्यासाठी कोणतीही कसर ठेवली जाणार नाही असा महाविकास आघाडीचा इरादा स्पष्ट जाणवत आहे.

एकीकडे महाविकास आघाडीची जागावाटपावर चर्चा सुरु असतानाच आता अजित पवार यांनीही एक डाव खेळला आहे. अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना भाऊबिजेसंदर्भात एक मोठे गिफ्ट देण्याची घोषणी केली आहे. तर भाजपतर्फे अमित शहा हे जागावाटपावर रणनिती आखत आहे. तर तिसरीकडे शिवसेनेचे एकनाथ शिंदे हेही आपला जनाधार आणखी मजबूत करत आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मोठे निकाल हाती येतील आणि रंगत वाढेल हे नक्की.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+