मतदान करायचे तर 'या' 12 पैकी लागणार कोणतेही 1 ओळखपत्र, जाणून घ्या मतदानाचे संपूर्ण वेळापत्रक
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून निवडणूक आयोग मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्नशील आहे तर दुसरीकडे राजकीय पक्ष आपला जोरदार प्रचार करत आहेत. राज्यात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे.
निवडणूक आयोगाने मतदारांसाठी ओळखपत्रांबाबत काही आवश्यक सूचना दिल्या आहेत. जर मतदान करायचे तर 'या' 12 पैकी कोणतेही 1 ओळखपत्र आपल्याकडे आवश्यक आहे. यापैकी एक जरी ओळखपत्र आपल्याकडे नसेल तर आपली मतदानाची संधी हातची जाऊ शकते.

या ओळखपत्रांद्वारे मतदान करु शकता
मतदान करताना मतदार फोटो ओळखपत्र आवश्यक आहे. मात्र, जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसल्यास, आणखी बारा प्रकारच्या ओळखपत्रांचा वापर करून आपण आपला मतदानाचा हक्क बजावू शकता. ही ओळखपत्रे अशी आहेत
- आधार कार्ड
- मनरेगा जॉब कार्ड
- बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये असलेले फोटोसह पासबुक
- कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत विमा स्मार्ट कार्ड
- वाहन चालक परवाना
- पॅनकार्ड
- नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड
- भारतीय पासपोर्ट
- फोटोसह पेन्शन दस्तऐवज
- केंद्र, राज्य सरकार किंवा सार्वजनिक उपक्रमाने जारी केलेले ओळखपत्र
यापैकी कोणतेही एक ओळख पत्र मतदान केंद्रावर दाखवले की मतदार मतदान करू शकणार आहे.
निवडणूक आयोगाने या कागदपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र मतदान केंद्रावर दाखवल्यास आपण मतदान करू शकतो. या सोयीमुळे प्रत्येक मतदाराला मतदान करण्याची संधी मिळणार आहे, मग ते मतदार ओळखपत्र असो किंवा अन्य कोणतेही पुरावे असो. मतदान हा लोकशाहीचा महत्त्वाचा घटक आहे. आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं योगदान देण्यासाठी मतदान करणे अत्यंत गरजेचं आहे.
मतदान कार्यक्रम एका टप्प्यात (288 विधानसभा मतदारसंघ)
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक 2024
- राजपत्र अधिसूचना जारी करण्याची तारीख 22.10.2024 (मंगळवार)
- नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख 29.10.2024 (मंगळवार)
- नामांकन छाननीची तारीख 30 ऑक्टोबर 2024 (बुधवार)
- उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2024 (सोमवार)
- मतदानाची तारीख 20 नोव्हेंबर 2024 (बुधवार)
- मतमोजणीची तारीख 23.11.2024 (शनिवार)
महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघ
महाराष्ट्रात एकूण 288 मतदारसंघ असून या सर्व मतदारसंघात निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्र विधानसभेची मुदत येत्या 26 नोव्हेंबरला संपणार आहेत. त्याअनुशंगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात 9 कोटी 59 लाख मतदार
महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा होताच आचारसंहीता लागू झाली तर दुसरीकडे निवडणुकीसाठी राजकीय पक्षांन जय्यत तयारी केली आहे. सत्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीने आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी यंदा 9 कोटी 59 लाख इतके मतदार आहेत.
2019 निवडणुकीत किती कुणाला जागा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने मुसंडी मारत 105 जागा मिळवल्या. मात्र 145 ची मॅजिक फिगर एकहाती गाठण्यात भाजपला अपयश आलं होतं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या स्थानावर , तर तेव्हांच्या राष्ट्रवादीनेही कांटे की टक्कर देत 54 जागा जिंकल्या. तर काँग्रेसने 44 जागा जिंकल्या.
काय बदलली समीकरणं
आता मात्र हे समीकरण बदलले असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली. हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदार आता राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहेत. उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळल्यानंतर पुन्हा आता राज्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आहे.












Click it and Unblock the Notifications