विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर! NDA सरकारचं तब्बल 7600 कोटींच्या विकासकामांचं महाराष्ट्राला गिफ्ट!
Maharashtra Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने महाराष्ट्रावर पुन्हा एकदा मेहेरनजर टाकली आहे. केंद्र सरकारकडून राज्याला आज अनेक मोठमोठे गिफ्ट मिळाले. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 10 वैद्यकीय महाविद्यालयांची भेट देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ काँन्फरन्सींगद्वारे आज महाराष्ट्रात अनेक विकासकामांची पायाभरणी झाली. सुमारे 7600 कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन आज करण्यात आलं.
मोदींचे व्हिडीओ काँन्फरन्सींगद्वारे संबोधन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज व्हिडीओ काँन्फरन्सिंगद्वारे विकासकामांचे उद्धाटन केले. यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणाही साधला. ते म्हणाले, आपण हरियाणा जिंकलो. आता आपल्याला महाराष्ट्रही जिंकायचा आहे. मोदी पुढे म्हणाले, हरियणाच्या निकालातून देशाचा मुड काय आहे, तो समजून आला. भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येणे ही ऐतिहासिक बाब आहे. अर्बन नक्षलबद्दल लोकांमध्ये खोटं पसरवलं जात आहे. पण आरक्षण हिसकावून मतांचे धृवीकरण होत असल्याचे समोर आलं आहे. काँग्रेसनेच शेतकऱ्यांच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

भाजपने हरियाणात राबवविलेल्या योजनांमुळे सामान्यांत आनंदाचे वातावरण होते. विरोधकांनी या निवडणुकीत वेगवेगळ्या पद्धतीने भाजपला अडवण्याचे प्रयत्न केले. पण काँग्रेसच्या अफवांना हरियणाची जनता बळी पडली नाही. मुस्लिमांनाही भाजपची भिती दाखवली जात आहे, असंही मोदींनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रात यापेक्षा मोठा विजय होईल
मोदी पुढे म्हणाले की, काँग्रेस ही देशात द्वेष पसरविणारी सर्वात मोठी फॅक्टरी आहे. काँग्रेस देशाला संपवत आहे. पण त्यांच्या अफवा महाराष्ट्राचे लोक ऐकणार नाहीत, याचीही खात्री आहे. हरियाणात भाजपचा विजय झाला त्यापेक्षा मोठा विजय महाराष्ट्रात मिळवायचा आहे. मोदी पुढे म्हणाले की, हिंदूंमध्ये भांडणे लावणे ही काँग्रेसची नीती आहे. स्वत:ची वोटबँक तयार करण्यासाठी काँग्रेस जातीयवाद करत आहे. सत्तेत येण्यासाठी काँग्रेस काहीही करू शकते, असा आरोपही मोदींनी केला.
महाराष्ट्राला मिळालं 7600 कोटींचं गिफ्ट
महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून आज सुमारे 7600 कोटींचं मोठं गिफ्ट मिळालं. त्यात 10 वैद्यकीय महाविद्यालयांचाही समावेश आहे. त्याबरोबरच महाराष्ट्रात मेट्रोचा विस्तारासाठीही निधी देण्यात आला. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कंटेनर बंदर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूरच्या अपग्रेडेशनची पायाभरणी आणि शिर्डी विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणीही करण्यात आली. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदींनी महाराष्ट्रावर दिलेल्या निधीमुळे भाजपला ही निवडणूक सोप्पी जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.












Click it and Unblock the Notifications