Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ठरलं, महाराष्ट्रात मोदींची पहिली सभा 'या' दिवशी! 45 एकरवर होणार सभा, 1 लाख लोक येणार

Maharashtra Assembly Election 2024 Narendra Modi Campaign Tour : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक प्रचाराचे नियोजन महाविकास आघाडी आणि महायुतीकडून झालेय. या निवडणूक प्रचारात स्टार प्रचाराकांना उतरवले जाणार आहे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा राज्यात घेण्यात येणार आहे.

पहिली सभा धुळ्यात 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या सभेसाठी धुळे शहरातील मालेगाव रोडवर असलेल्या खान्देश गो शाळेच्या मैदानावर जय्यत तयारी सुरु झाली आहे. तब्बल 45 एकरवर ही सभा होणार आहे. या सभेला एक लाख नागरिक येणार आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Narendra Modi Campaign Tour

मोदी 14 नोव्हेंबरपर्यंत सभा घेणार

महायुतीसाठी उत्तर महाराष्ट्र अनुकूल राहिलेलाय. त्या ठिकाणी धुळे, जळगाव, मालेगाव बाह्य येथील महायुतीच्या उमेदवारांची प्रचार सभा होणार आहे. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रात भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत 40 नेत्यांचा समावेश आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, नितिन गडकरी, शिवराजसिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे.

40 स्टार प्रचारक मैदानात

पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ दिवस महाराष्ट्रात प्रचार सभा घेणार आहेत. 14 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या प्रचार सभा होणार आहेत. काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. काँग्रेसचे 40 स्टार प्रचारक मैदानात उतरणार आहेत. त्यात राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राज्यातील बड्या नेत्यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या प्रचाराची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर असणार आहे. शिवसेना उबाठाची प्रचार उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सांभाळणार आहे.

राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा कुणाकडे

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रचाराची सूत्र शरद पवार, सुप्रिया सुळे सांभाळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा प्रचार अजित पवार करणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुती संयुक्त प्रचारसभाही घेणार आहेत. दिवाळीनंतर सर्व पक्षांचा प्रचार धडाक्यात सुरु होणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+