Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शिवसेना अपेक्षेपेक्षा थोडी पुढे, भाजप थोडं मागे; 'असं' ठरलं महायुतीचं जागावाटप...

महायुतीचे नेते गुरुवारी चंडीगढमध्ये एकत्र जमले. नायब सिंह सैनी यांच्या शपथविधीला भाजपचे सर्व जेष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी एनडीए आघाडीच्या मुख्यमंत्र्‍यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक झाली. एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या जागावाटपाचा फाँर्म्यूला मांडला. त्यानंतर आता भाजपने एक पाऊल मागे येत महाराष्ट्रात 140 ते 150 जागा लढण्याला होकार दिल्याची बातमी आहे. नव्या फाँर्म्यूल्यानुसार भाजप 140 ते 150, शिंदे सेना 80 ते 87 तर अजित पवार गट 60 ते 65 जागांवर लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नेमका कसे ठरले महायुतीचे जागावाटप

महायुतीचे नेते गुरुवारी नायब सिंह सैनी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी चंदीगढमध्ये जमले होते. यावेळी एनडीए आघाडीच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. त्यानंतर आता महायुतीच्या जागावाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. यामध्ये भाजपने 150 पेक्षा जास्त जागा लढवण्याचा हट्ट सोडलेला दिसला.

mahayuti sarkar

विधानसभा निवणुकीचे उमेदवारी अर्ज भरायला अवघे चार दिवस बाकी आहेत. महायुतीच्या गोटातून आलेल्या माहितीनुसार भाजप आता 140 ते 150 जागा लढण्याच्या तयारीत आहे. तर शिंदेंची शिवसेना 80 ते 87 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी 60 ते 65 जागा लढणार असल्याची माहिती समजतेय. 20 ते 25 जागांवर अजूनही चर्चा सुरु आहे, अशी माहिती महायुतीच्या वर्तुळातून समोर आली आहे.

आज जाहीर होणार भाजपची पहिली यादी

भाजपची पहिली उमेदवार यादी आज शुक्रवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काही नावांसाठी आग्रह धरल्याची माहिती आहे. संघाचा हा आग्रह भाजप पूर्ण करणार का, याचीही उत्सुकता आहे. भाजपच्या पहिल्या यादीत 100 हून अधिक जणांचा समावेश असेल, अस सांगितलं जातंय. तसेच 30 टक्के उमेदवार बदलले जातील, अशीही चर्चा आहे. त्यामुळे भाजपने भाकरी फिरवली तर नेमकी कुणाला संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+