Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बिहार पॅटर्न राबवा, मला CM बनवा; अजित पवारांचा अमित शहांसमोर प्रस्ताव?, शिवसेनेचा 107 जागांवर दावा

Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासमोर एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडल्याची माहिती समोर आलेली आहे. मुंबई विमानतळावर काल अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बैठक पार पडली. यात अजित दादांनी मुख्यमंत्री पदाची महत्त्वकांक्षा व्यक्त केली.

बिहार पॅटर्नचा दिला दाखला

अजित पवार यांनी बिहार पॅटर्नचा दाखला देत महायुतीने विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करावे, असे अमित शाह यांना सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दावा ठोकलेल्या जागांबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

AMit Shaha

भाजपकडूनही जोरदार तयारी सुरू

एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह हे नुकतेच मुंबईत दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी अमित शाह यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले होते. तसेच शाहा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठीही गेले होते. तत्पूर्वी रविवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर अमित शाह आणि महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते. याशिवाय, भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी पडद्यामागे जोरदार तयारी केली जात आहे.

महायुतीच्या जागावाटपाबाबत काय ठरलं?

अजितदादा गटातील एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. भाजप 288 पैकी जवळपास 150 जागा लढवू शकते. तर अजितदादा गटाला 70 जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे. अमित शाह यांच्यासोबत मुंबई विमानतळावर झालेल्या बैठकीत विधानसभेच्या 40 जागांबाबत चर्चा झाली. या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असल्याने आम्ही या जागा सोडणार नाही. याशिवाय, आम्हाला मविआच्या काळातील राजकीय समीकरणानुसार काँग्रेसच्या वाट्याच्या 10 ते 12 जागा हव्या असल्याचेही अजितदादा गटातील नेत्याकडून सांगितले जात आहे.

शिवसेनेचा 107 जागांचा प्रस्ताव

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात महायुतीमध्ये सहभागी पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राज्यातील 288 पैकी 107 जागांवर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. वृत्तानुसार, शिंदे यांच्या प्रस्तावात 107 जागांची संपूर्ण माहिती आहे. या प्रस्तावात सर्व मतदारसंघांच्या जातीय समीकरणावरही चर्चा करण्यात आली आहे. याशिवाय या प्रस्तावात शिंदे यांच्या शिवसेनेने पक्ष कोणाला आणि का तिकीट देऊ इच्छित आहे, याचाही उल्लेख केला आहे.

शहरी भागातील जागेकडे शिंदेंचे लक्ष

सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, शिंदे यांचा विशेषत: मुंबई, ठाणे आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (एमएमआर) मध्ये जास्तीत जास्त जागा मिळवण्यावर भर आहे, ज्या भागात परंपरेने शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी) ज्या मतदारसंघात उमेदवार उभे करणार आहे, त्या मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी शिंदे यांचा गट इच्छुक असल्याचेही बोलले जात आहे. शिवसेनेच्या राजकीय ओळखीच्या मध्यवर्ती भागात शिंदे गटाचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा एक मार्ग म्हणून या रणनीतीकडे पाहिले जाते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+