अबब..! सोन्याची बिस्किटे, चांदीची वीट; अहिल्यानगरमध्ये सापडलं 'एवढ्या' कोटींची घबाड
Maharashtra Assembly Election 2024 : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. निवडणूक आयोग, पोलिस व आयकर विभागाने डोळ्यात तेल घालून तपासणी सुरु केली आहे. त्यातच काल दिवाळीच्या दिवशी पुणे-संभाजीनगर रस्त्यावरील सुपा (जि. अहिल्यानगर) टोलनाक्यावर पोलिसांना सुमारे 24 कोटींच्या दागिन्यांचं घबाड सापडलं. या दागिन्यांचा पंचनामा करुन ते आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

सुपे टोलनाक्यावर केली कारवाई
राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू संबंधित कारवाई केली जात आहे. अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर तैनात असलेल्या पथकाने 23 कोटी 71 लाख रुपयांचे सोने, चांदी, हिरे, मोत्याचे दागिने पकडले. या दागिन्यांचा पंचनामा करून इतर कार्यवाही करून दागिने आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. बीव्हीसी लॉजिस्टिक कंपनीचे कर्मचारी मुंबई येथील झवेरी बाजार येथून सोने-चांदी आणि हिरे- मोत्याचे दागिने घेऊन अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जळगाव येथे चालले होते. त्यांना या कारवाईत पकडण्यात आल्याचे समजते.
कारवाईत काय-काय सापडलं
या कारवाईत चांदीची 40 किलोची वीट, सोन्याची बिस्किटे, आणि 53 किलो चांदी, हिरे-मोत्यांचे दागिने ताब्यात घेण्यात आले. तपासणीत 14 अधिकृत पावत्याही आढळून आल्या. तर वाहनासोबत असलेल्या वाहतूक कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे मौल्यवान वस्तूंची वाहतूक करण्याचा परवाना नव्हता. सुपा पोलिसांनी गोल्ड व्हॅल्युअर आणि कंपनीच्या प्रतिनिधींसमोर या संबंधीचा 15 पानांचा पंचनामा केला आहे.
चौकशीत चार जणांना घेतलं ताब्यात
हे सगळं दागिने आयकर विभागाकडे जमा करण्यात आले आहे. बिलांची खात्री केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलीये. या प्रकरणी बीव्हीसी लॉजिस्टिक कंपनीचे कर्मचारी चालक शांतकुमार कट्टीवल्ली, भय्यासाहेब बनसोडे, दिगंबर काजळे, बीव्हीसी लॉजिस्टिक कंपनीचे असिस्टंट मॅनेजर गोरख भिंगारदिवे या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाई एकच खळबळ उडाली आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications