Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'हे' अपक्ष, बंडखोर अन् छोट्या पक्षांचे उमेदवार धोक्यात आणू शकतात मविआ महायुतीच्या जागा, वाचा यादी

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचे जोरात वारे वाहत असून या निवडणुकीत मराठवाडा आणि विदर्भातील शंभरावर विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रात कुमाची सत्ता येईल हे ठरवणार आहे. यासह मुख्यमंत्री कुणाचा होणार हेही ठरवणार आहे. राज्यात अशा पंधरा जागा आहेत जिथे अपक्ष जोरदार कामगिरी करण्याची शक्यता आहे.

अक्कलकुवा पासून कोल्हापूर उत्तर अशा पंधरा मतदारसंघात अपक्ष, वंचित बहुजन आघाडी, एका जागेवर प्रहार आणि एका जागेवर एमआयएम आपला करिश्मा दाखवू शकते. यासह महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यातील बंडखोरांचाही यात समावेश आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Independent MIM BVA Rebel Candidates hit MVA Mahayuti

पाथरीत बाबाजानी दुर्राणी परतूरमध्ये दोन अपक्षांना संधी

राज्यातील पंधरा जागा महाविकास आघाडी आणि भाजपसाठी धोक्याच्या ठरू शकतात कारण येथे अपक्ष आणि इतर पक्षातील उमेदवार प्रबळ आहेत आणि ते जोर लावू शकतात. यात काही तिकीट न मिळाल्याने नाराज उमेदवारही आहेत. पाथरी आणि परतूर मतदारसंघातील समि‍करणे अद्याप कुणी सांगू शकलेले नाही. कारण सर्वच उमेदवार येथे प्रबळ दावेदार आहेत.

संभाजीनगरमध्ये एमआयएम करिष्मा दाखवणार?

औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपला फटका बसू शकतो तिथे अतूल सावे लढत असून त्यांच्या विरोधात प्रबळ दावेदार माजी खासदार इम्तियाज जलील आहेत, असेच चित्र औरंगाबाद मध्य मतदारसंघातही आहे तिथे नासेर सिद्दीकी एमआयएमकडून लढत आहेत तर शिवसेना शिंदे गटाकडून प्रदीप जैस्वाल हे लढत आहेत. या मतदारसंघात ऐनवेळी उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराने माघार घेतली त्याजागी दुसरा उमेदवार डॅमेज कंट्रोल भरुन काढण्यासाठी ठाकरे यांनी दिला पण आता पुढे काय होणार हे येत्या 23 नोव्हेंबरलाच समजेल.

हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर अन् बापू भेगडे यांना संधी

पालघरच्या नालासोपारा आणि वसई मतदारसंघात हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर यांचे वर्चस्व पुर्वापार आहे, त्यामुळे ते तेथून जिंकू शकतात तर मावळमध्ये एक विरोधातील पक्ष सोडता जवळपास सर्वच पक्षांनी बापूसाहेब भेगडे या बंडखोर उमेदवारांला जोरदार पाठींबा दिला आहे त्यामुळे तेही तेथून जिंकू शकतात.

महायुती, मविआला धोक्यात आणू शकणारे 'हे' 15 उमेदवार

  1. अक्कलकुवा - हिना गावित (अपक्ष)
  2. रावेर - शमिभा पाटील (वंचित बहुजन आघाडी)
  3. अचलपूर -बच्चू कडू (प्रहार- तिसरी आघाडी)
  4. जिंतूर - सुरेश नागरे (वंचित बहुजन आघाडी)
  5. पाथरी - बाबाजानी दुर्राणी (अपक्ष)
  6. परतूर - रामप्रसाद थोरात (वंचित बहुजन आघाडी)
  7. परतूर - सुरेश कुमार जेथलिया (काँग्रेस बंडखोर)
  8. औरंगाबाद मध्य- नासेर सिद्दीकी (एमआयएम)
  9. कन्नड - हर्षवर्धन जाधव (अपक्ष)
  10. औरंगाबाद पूर्व इम्तियाज जलील (एमआयएम)
  11. नालासोपारा - क्षितिज ठाकूर (BVA)
  12. वसई - हितेंद्र ठाकूर (BVA)
  13. भिवंडी पूर्व - रईस शेख (समाजवादी पक्ष)
  14. मावळ - बापूसाहेब भेगडे (अपक्ष)
  15. गेवराई - समीर भुजबळ (अपक्ष)
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+