हा सर्व्हे सांगतोय, महाराष्ट्रात कुणाची सत्ता! मराठवाड्यात महायुतीला फटका, बहुमतापर्यंत कोण पोहचणार?
Maharashtra Assembly Election 2024 IANS-Matrize survey : राज्यात विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे असून ही स्थिती अशी आहे की, कुणाचा विजय आणि कोण पराजित होईल हे सांगता येत नाही. निरनिराळे सर्व्हे समोर येत आहेत, कुणी महाविकास आघाडीच्या तर कुणी महायुतीच्या बाजूने महाराष्ट्रात जनतेचा कल असल्याचे सर्व्हेतून समोर येत आहे.
नुकताच 10 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालात जवळपास लाखभर मतदारांना, जनतेला कोण जिंकणार हे विचारुन आयएनएस माध्यम समुहाने सर्व्हे केला आहे. या सर्व्हेतून महायुती जिंकणार असा अंदाज बांधण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला फटका बसेल हे सांगण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकांच्या निकाल पाहता महाराष्ट्रात घेता महाविकास आघाडीचे पारडे जड दिसत आहे. मात्र, लाडकी बहीण योजना, योजनांचा पाऊस आणि सध्याच्या संख्याबळाचा विचार केल्यास महायुतीही चांगली टस्सल देत असल्याचे स्पष्ट आहे. आयएनएनएस माध्यम समुहाने केलेल्या निवडणूक मतदानपूर्व सर्वेक्षणातून राज्यात कोणाचं सरकार येणार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, महायुतीची सत्ता येणार की महाविकास आघाडीची याबाबत अंदाज व्यक्त केला आहे. त्यामध्ये, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची चिन्हे दिसून येतात.
काय म्हटले सर्व्हेत?
महाराष्ट्र निवडणूक 2024 च्या सर्वेक्षणात भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांचा समावेश असलेल्या सत्ताधारी महायुतीला स्पष्ट विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
महाविकास आघाडीला दाखवल्या कमी जागा
सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्राच्या 288 सदस्यीय विधानसभेत महायुती 145-165 जागा मिळवू शकते, तर शिवसेना (UBT), काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीला 106-126 जागा मिळण्याचा अंदाज आहे.सत्ताधारी आघाडीलाही मतसंख्येच्या बाबतीत विरोधकांवर बाजी मारल्याचे चित्र आहे. सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार, महायुतीला महाविकाससाठी 41 टक्के मतांच्या तुलनेत 47 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. इतरांना 12 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या भागात कुणाला जास्त जागा?
मराठवाड्यात महायुतीला फटका
- सर्वेक्षणातून राज्यातील विभागीय निकालाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील 70 पैकी 31 ते 38 जागांवर महायुतीला यश मिळू शकते. महाविकास आघाडीला 29 ते 32 जागांवर यश मिळण्याचा सर्व्हेचा अंदाज
- विदर्भातील 62 जागांवर महायुतीला 32 ते 37 जागांवर यश मिळण्याचा अंदाज. तर, महाविकास आघाडीला 21 ते 26 जागा मिळण्याचा सर्व्हेचा अंदाज.
- मराठवाड्यातही 46 पैकी 18 ते 24 जागांवर महायुतीला यश मिळण्याची शक्यता, मात्र, मराठवाड्यात महाविकास आघाडीचं पारडं जड असून येथे मविआला 20 ते 24 जागा मिळू शकतात.
- ठाणे आणि कोकणातील 39 जागांपैकी 23 ते 25 जागा महायुतीला मिळू शकतील. 10 ते 11 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळेल, असा अंदाज. मुंबईतील 36 जागांपैकी 21 ते 26 जागांवर महायुती आणि 16 ते 19 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळेल असा सर्वेक्षणातून अंदाज.
- उत्तर महाराष्ट्रातील 35 जागांवपैकी 14 ते 16 जागांवर महायुतीला यश मिळेल, आणि 16 ते 19 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळेल असा अंदाज
अंतीम निकाल 23 नोव्हेंबरलाच
इतर राजकीय पक्ष किंवा अपक्षांना एकत्रित धरुन केवळ 5 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज दर्शविण्यात आला आहे. राजकीय सर्वेक्षणातून हा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी 23 नोव्हेंबर रोजीच अंतिम चित्र स्पष्ट होणार हेही तितकेच खरे.
या पक्षाला एवढी मतांची टक्केवारी
मॅट्रिझ सर्वेक्षणानुसार, भाजपला पश्चिम महाराष्ट्र (48%), विदर्भ (48%), आणि ठाणे-कोकण (52%) मध्ये लक्षणीय पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील MVA अशा प्रदेशांमध्ये जोरदार कामगिरी करेल असा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनुक्रमे 47 टक्के आणि 44 टक्के अपेक्षीत मते आहेत.
सर्वेक्षणाचे निष्कर्ष, निकालाच्या दिवशी खरे ठरले तर, महाविकास आघाडीला मोठा धक्का बसेल, या वर्षी मे मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत, महाविकास आघाडीने राज्यातील 48 लोकसभेच्या 31 जागांवर विजय मिळवला तर NDA 17 जागांवर मर्यादित राहिला.
'या' काळात सर्व्हेक्षण, इतक्या उत्तरदात्यांचा समावेश
20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती राज्यात पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे, असे सर्वेक्षण एजन्सी मॅट्रिझने केलेल्या जनमत चाचणीने वर्तवले आहे. 10 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात 1,09,628 उत्तरदात्यांचा समावेश आहे.












Click it and Unblock the Notifications